पुरातील लोकांना वाचवण्यासाठी पाठीची केली पायरी, आता हे बक्षिस जाहीर

पुरातील लोकांना वाचवण्यासाठी पाठीची केली पायरी, आता हे बक्षिस जाहीर

दक्षिणे केरळ सध्या पुराचा सामना करत आहे. लष्कर आणि एनडीआरएफच्या टीम्स लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच काम वेगाने करत आहे.

  • Share this:

केरळ, 22 ऑगस्ट : दक्षिणे केरळ सध्या पुराचा सामना करत आहे. लष्कर आणि एनडीआरएफच्या  टीम्स लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच काम वेगाने करत आहे. या सगळ्यात एक असा देवदूत आहे ज्याने आपल्या पाठीची पायरी केली आणि लोकांना सुरक्षित ठिकणी पोहचण्यासाठी मदत केली. त्याच्या या कामगिरीमुळे आज अनेकांचं प्राण वाचले आहेत.

आपल्या जीवाची परवा न करता इतरांना मदत करणाऱ्या या व्यक्तिचं नाव आहे 'जैसल केपी'. जैसल यांचा मच्छिमारीचा व्यवसाय आहे. स्वत:च्या पाठीची पायरी करून त्यांनी सगळ्यांना मदत केली. प्रसारमाध्यमांच्या अहवालांनुसार, जैसल यांच्या या उत्तम कामगिरीमुळे त्यांना  रोख पारितोषिकासह एक नवीन घर मिळणार आहे.

'Times of India' च्या वृत्तानुसार, केरळच्या मलप्पुरमजवळ तनूरच्या चप्पापडीमध्ये राहणाऱ्या 32 वर्षांच्या जैसल केपी  यांचा व्हिडिओ 17 ऑगस्टला व्हायरल झाला. खरंतर त्यावेळी त्यांच्या परिसरात पूरामुळे काही महिला आणि लहान मुलं अडकली होती. मलप्पुरमच्या ट्रॉमा केयर यूनिटचे स्वयंसेवक असलेले जैसल यांनी क्षणाचाही विलंब न करता लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी धाव घेतली. बोटीमध्ये महिलांना बसवण्यासाठी त्यांनी आपल्या पाठीची पायरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा पाऊस पडतोय.

जैसल कॅपी हे त्यांच्या बायको आणि तीन मुलांसह एका खोलीत राहतात. गेल्या 10 वर्षांपासून ते पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सहभागी असतात. त्यामुळे आता वेळ आली आहे ती त्यांच्या या कामगिरीला बक्षिस देण्याची.

 

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

First published: August 22, 2018, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading