केरळमध्ये पाऊस थांबला, मदत कार्याला वेग आता संकट रोगराईचं

केरळमध्ये पाऊस थांबला, मदत कार्याला वेग आता संकट रोगराईचं

केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारपासून थोडी उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय तर मदत कार्यालाही वेग आलाय.

  • Share this:

कोच्ची, 20 ऑगस्ट : केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारपासून थोडी उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय तर मदत कार्यालाही वेग आलाय. आठ दिवसानंतर कोच्चीमध्ये विमानसेवा सुरू झालीय तर कर्नाटकनेही आंतरराज्यीय बस वाहतूक सुरू केलीय. पाऊस थांबल्याने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याच्या कामाला वेग आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिलीय. या महापूरामुळे 7,24,649 लोकांना मदत छावण्यांमध्ये राहावं लागतंय.

पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने 5,645 तात्पुरती शिबीरं तयार केली आहेत. तर मृतांची संख्या 370 झाली आहे. 1924 नंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे. आत्तापर्यंत असं भीषण संकट कधीच केरळने अनुभवलं नव्हतं. त्यामुळे सगळ्या ठिकाणांहून आम्ही मदतीचं आवाहन केल्याचंही विजयन यांनी सांगितलं.

केरळमध्ये देशभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. महाराष्ट्रातूनही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली 100 डॉक्टरांचं एक पथक केरळमध्ये दाखल झालं असून औषधींचा काही टन साठा त्यांनी सोबत नेला आहे. महाराष्ट्राने या आधीच 20 कोटींची मदत जाहीर केलीय.

मदत कार्यात गुंतलेल्या बचाव पथकांनी अतिशय साहस दाखवत लोकांना वाचवलं असून त्यांच्या कामाचं देशभरातून कौतुक होतंय.

First published: August 20, 2018, 10:08 AM IST

ताज्या बातम्या