LIVE NOW

LIVE : केरळ- युएई आणि मालदिवची मदत केंद्राने नाकारली, स्वबळावरच उभारणी करणार

Lokmat.news18.com | August 23, 2018, 11:32 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 23, 2018
auto-refresh

Highlights

11:08 am (IST)

कुर्ग : दक्षिण कर्नाटकमधलं थंड हवेचं ठिकाण कूर्गमध्येही पावसानं हाहाकार माजवला आहे. मडिकेरी जिल्ह्यातले अनेक महत्वाचे रस्ते घाट स्वरुपाचे आहेत.. यातले अनेक रस्ते अक्षरशः वाहून गेलेत किंवा खचले आहेत. सोमवारपेट, विराजपेटला जायचे रस्ते बंद आहेत.. चिखल हटवण्याच्या कामालाच एवढा वेळ लागतोय की हे रस्ते पुन्हा बांधून तयार व्हायला खूपच वेळ लागणार आहे, हे निश्चित.कूर्ग अर्थात मडिकेरी भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी केंद्र सरकारनंही मदत पाठवली आहे. मैसूर हवाई तळावर वायुदलाची 2 मोठी विमानं काल लँड झाली. खायच्या वस्तू, धान्य, साबण, सॅनिटरी नॅपकिन अशा अनेक महत्वाच्या वस्तू आता मैसूरहून मडिकेरीला पाठवण्यात येत आहेत. 

 

11:07 am (IST)

कोच्ची : केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झालेत. ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपतं घेण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे त्याची सफाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जे लोक घर सोडून गेले होते, ते आता परतायला लागलेत.. पण घरातलं चित्र फारसं आशादायक नाही. कारण पै पै जमवून घेतलेल्या महागड्या वस्तू संपूर्णपणे खराब झाल्या आहेत.. टीव्ही, फर्निचर, एसी, कॉम्प्युटर, पदडे... पावसाच्या पाण्यानं सगळंच बाद केलंय.. हजारो कुटुंब अशी आहेत ज्यांचं नुकसान लाखोंमध्ये गेलं आहे.. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय.. आता या सर्वांवर विमा कंपन्यांकडून पैसे मंजूर करून घ्यायची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली आहे. 

 

9:57 am (IST)

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. अस्वस्थ वाटू लगाल्यानं त्यांना नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरीमधल्या प्रायमस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुंबई काँग्रेसचे दिर्घकाळ अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांचे ते वडील होते. 1972 मध्ये त्यांनी विद्यार्थी नेते म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. गांधी घराण्याचे ते विश्वासू म्हणून ओळखले जात. राजीव गांधींचे जवळचे मित्र होते. खासदार, केंद्रात मंत्री आणि पक्षातही विविध पदांवर त्यांनी काम केलं. मुंबईत काँग्रेस वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1987 मध्ये त्यांनी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद भुषवलं होतं.

 

Load More
नवी दिल्ली, ता.23 ऑगस्ट : केरळच्या पूरग्रस्तांसाठी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) ७०० कोटी आणि मालदीवने ३५ लाखांची मदत देऊ केली होती. पण कोणतीही विदेशी मदत स्वीकारण्यास केंद्र सरकार राजी नाही. सुनामीच्या संकटानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपत्तीग्रस्तांसाठी विदेशी मदत न स्वीकारण्याचा निर्णय डिसेंबर २००४मध्ये घेतला होता. त्याच धोरणाची अंमलबजावणी केरळबाबत करण्यात येत आहे. या आधी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी ही मदत स्वीकारण्याबाबत केंद्राकडे विचारणा केली होती. मात्र भारताने मदतीबद्दल या देशांकडे धन्यवाद व्यक्त केले असून मदत स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. महापूराने केरळमध्ये तब्बल 20 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. आणि आता पुनर्वसनाचं सर्वात मोठं आव्हान निर्माण झालं आहे. देशभराततून मदतीचा ओघ केरळकडे येत असून महाराष्ट्रातल्या 100 डॉक्टरांचं पथक केरळमध्ये बचावकार्यात सहभागी झालं आहे. राज्यातल्या 14 जिल्हांपैकी 12 जिल्हे पाण्यात गले असून 14 लाख नागरिक विस्थापीत झाले आहेत.  
corona virus btn
corona virus btn
Loading