तिरुवनंतपुरम, 11 मार्च : एका भरधाव कारने (Car) तब्बल 8 जणांना उडवलं आहे. ज्यामध्ये 4 विद्यार्थीनींचा (student) समावेश आहे. केरळच्या (kerala) अलप्पुझामध्ये हा भीषण अपघात (accident) आहे. या अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. अपघाताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या या कारच्या धडकेत एकूण 8 जण जखमी झालेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
व्हिडीओतील दृश्यं पाहाल, तर वेगानं जाणाऱ्या या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याचं दिसतं आहे. त्यानंतर या कारनं रस्त्यावरील अनेकांना उडवलं आहे. सुरुवातीला ही कार एका सायकलला धडकते, ज्या सायकलवरून एक विद्यार्थीनी जात होती. त्यानंतर याच कारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये पायी जाणाऱ्या 3 विद्यार्थ्यानींनादेखील ही कार उडवते, या विद्यार्थीनी शाळेतून घरी परतत होत्या. भीषण अपघाताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहाराच येतो. अशाच पद्धतीने या कारने आणखी चार जणांना उडवलं.
या अपघातात जखमी झालेल्या आठही जणांना एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आठ जणांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.