S M L

केरळमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यावर भरवलं बीफ फेस्टिव्हल

केंद्र सरकारनं देशभरात बीफ बॅनचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा विरोध म्हणून केरळमध्ये यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे केलं ते क्रौर्याची हद्द गाठली म्हणावं लागेल.

Sachin Salve | Updated On: May 29, 2017 11:53 PM IST

केरळमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यावर भरवलं बीफ फेस्टिव्हल

29 मे : केरळच्या यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कदाचित हे माहित नसावं की त्यांच्या पक्षाचं अगोदरचं चिन्हं हे गाय आणि वासरू होतं. कारण कन्नूरमध्ये बीफ बॅनचाविरोधात म्हणून भररस्त्यावर वासराला कापून त्याचं बीफ खाण्यासाठी वाटण्यात आलंय.

केंद्र सरकारनं देशभरात बीफ बॅनचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा विरोध म्हणून केरळमध्ये यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे केलं ते क्रौर्याची हद्द गाठली म्हणावं लागेल. ही दृश्य त्याच घटनेची आहेत. वासराला एका गाडीत घातलं गेलं आणि त्याच्या मानेवर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरी चालवली. मग काय भाजपला काँग्रेसवर टीका करायची आयतीच संधी मिळाली.

कन्नूरच्या घटनेचं सगळ्या पक्षांनी निषेध केलाय. खुद्द काँग्रेसनं ह्या घटनेत सहभागी असलेल्यांना पक्षातून काढून टाकलंय. पण ही घटना होऊच कशी शकते असा सवाल देशभर विचारला जातोय.मोदींच्या बॅनविरोधात ईशान्यकडील राज्य तसंच दक्षिणेतल्या राज्यांनी दंड थोपटलेत. केरळनं तर बीफ बंदीचा निर्णय़ लागू करणार नसल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रातूनही शेतकरी बीफ बंदीचा निषेध करतायत. कारण जनावरांचा बाजार उठण्याची चिन्हं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 09:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close