मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिवसभरात फक्त अर्धा तास फोन बंद करून ठेवा; असे आश्चर्यकारक फायदे लगेच दिसू लागतील

दिवसभरात फक्त अर्धा तास फोन बंद करून ठेवा; असे आश्चर्यकारक फायदे लगेच दिसू लागतील

फोन बंद करणं म्हणजे फोनमध्ये न बघता बाजूला ठेवणं, असं नाही. तर, फोन स्विच ऑफ (Switched Off) करण्याबद्दल बोलतोय. तुम्ही कितीही फोन वापरत असलात तरी फक्त 30 मिनिटं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

फोन बंद करणं म्हणजे फोनमध्ये न बघता बाजूला ठेवणं, असं नाही. तर, फोन स्विच ऑफ (Switched Off) करण्याबद्दल बोलतोय. तुम्ही कितीही फोन वापरत असलात तरी फक्त 30 मिनिटं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

फोन बंद करणं म्हणजे फोनमध्ये न बघता बाजूला ठेवणं, असं नाही. तर, फोन स्विच ऑफ (Switched Off) करण्याबद्दल बोलतोय. तुम्ही कितीही फोन वापरत असलात तरी फक्त 30 मिनिटं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

नवी दिल्ली, 29 जुलै : स्मार्टफोन (Phone) आपल्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा घटक झाला आहे. आपल्याला फोनची इतकी सवय झाली आहे, की त्याशिवाय आपण काही मिनिटंही राहू शकत नाहीत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण नेहमी स्मार्टफोनसोबत असतो. काही कारणाने फोन बिघडला असेल तर करमत नाही. तेवढंच काय तर फोन चार्जिंगला लावला असेल तरीही अस्वस्थ वाटत राहतं.
जेवताना फोन, गप्पा मारताना फोन, टीव्ही बघताना फोन आणि काही जण तर बाथरूमला जातानाही फोन वापरत असतात. खरं तर फोनची इतकी सवय चांगली नाही. पण आपण त्याचा फार विचार करत नाही. पण आपण फोनशिवाय आपल्या दिवसातील काही मिनिटं घालवली तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया झोपण्याच्या अर्धा तास आधी स्मार्टफोन बंद करून ठेवल्यास काय होतं. या संदर्भात हर जिंदगी डॉट.कॉमने वृत्त दिलंय.
एका संशोधनानुसार, तुम्ही झोपण्याच्या किमान अर्धा तास फोन बंद करायला हवा. फोन बंद करणं म्हणजे फोनमध्ये न बघता बाजूला ठेवणं, असं नाही. तर, फोन स्विच ऑफ (Switched Off) करण्याबद्दल बोलतोय. तुम्ही कितीही फोन वापरत असलात तरी फक्त 30 मिनिटं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.
मेंदू वेगाने काम करेल
फोन बंद केल्याने तुमचा मेंदू (Brain) वेगाने कार्य करेल. अनेक वैज्ञानिक अभ्यासात अशी माहिती समोर आली आहे की आपला मेंदू मल्टिटास्किंग (Multitasking) करत नाही. पण तो खूप वेगाने एका कामातून बाहेर पडून दुसरे काम करतो. त्यामुळे तुम्ही फोन बंद केला आणि शांत डोक्याने विचार केल्यास तुमच्या मेंदूला अधिक क्रिएटिव्ह स्पेस मिळेल.
डोळ्यांसाठी फायदे
आपण घरातील लाईट्स बंद करून झोपायला जातो, पण लाईट बंद असताना स्मार्टफोन वापरत असतो. तर, स्मार्टफोनचा ब्लू लाईट (Blue Light) आपल्या डोळ्यांसाठी त्रासदायी असतो आणि त्यामुळे आपली नजर कमकुवत होते. म्हणून तुम्ही फोन अर्धा तास बंद ठेवला तर ते तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
चांगली झोप येईल
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन झोपण्याच्या 30 मिनिटं आधी बंद केलात, तर नोटिफिकेशनच्या (Notification) आवाजाने तुमच्या झोपेत अडथळा येणार नाही आणि तुम्हाला चांगली झोप येईल. फोन सुरू असला की नोटिफिकेशनमुळे अनेकांची झोप खराब होते.
मानेच्या समस्यांपासून मिळेल आराम
झोपण्याच्या 30 मिनिटं आधी स्मार्टफोन बंद केला तर ते मानेसाठी (Neck) फायद्याचं ठरेल. रात्री झोपताना ज्या स्थितीत जास्त वेळ स्मार्टफोन वापरतो, त्यामुळे मानदुखी होण्याची शक्यता असते.
आरोग्य सुधारेल
IIT बॉम्बेतील प्रोफेसर गिरीश कुमार यांनी काही काळापूर्वी एक अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासानुसार, जर स्मार्टफोन दररोज 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापरला तर ते 10 वर्षांनंतर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तसंच तुम्हाला मेंदूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हालाही वरीलपैकी कोणताही त्रास होत असेल, तर तुम्ही दिवसातून अर्धा तास फोन बंद करून ठेवा. त्याचा तुम्हाला फायदा होईल.
First published:

Tags: Health, Health Tips, Mobile

पुढील बातम्या