मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

तुमचा Android फोन विकण्याआधी करा हे महत्त्वाचं काम, नाहीतर येतील समस्या

तुमचा Android फोन विकण्याआधी करा हे महत्त्वाचं काम, नाहीतर येतील समस्या

मेल (Gmail) - काही मेसेजमध्ये अ‍ॅडव्हरटायजर्स ट्रॅकिंगपिक्सलचा वापर करतात. हा एक लहानसा फोटो असतो, जो लपलेला असतो. ज्यावेळी युजर मेसेज ओपन करतो, त्यावेळी हा फोटो मेल पाठवणाऱ्याला रिपोर्ट करतो. iOS 15 मध्ये मेल ट्रॅकर ब्लॉक करण्यासाठी टूल आहे, जो सेटिंगमध्ये मेल सेक्शनमध्ये इनेबल करता येतो.

मेल (Gmail) - काही मेसेजमध्ये अ‍ॅडव्हरटायजर्स ट्रॅकिंगपिक्सलचा वापर करतात. हा एक लहानसा फोटो असतो, जो लपलेला असतो. ज्यावेळी युजर मेसेज ओपन करतो, त्यावेळी हा फोटो मेल पाठवणाऱ्याला रिपोर्ट करतो. iOS 15 मध्ये मेल ट्रॅकर ब्लॉक करण्यासाठी टूल आहे, जो सेटिंगमध्ये मेल सेक्शनमध्ये इनेबल करता येतो.

तुमचा फोन दुसऱ्याला देताना, विकताना काही टीप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नवा फोन घेताना जुन्या फोनच्या डेटाची काळजी घेणं गरजेचं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : जर तुम्हाला तुमचा जुना Android Smartphone विकायचा असेल, तर काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा डेटा सुरक्षित राहील, तसंच ज्याला फोन विक्री करणारा आहे तोदेखील तुमच्या डेटाचा गैरवापर करू शकणार नाही. त्यामुळे तुमचा फोन दुसऱ्याला देताना, विकताना काही टीप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नवा फोन घेताना जुन्या फोनच्या डेटाची काळजी घेणं गरजेचं आहे.

micro SD Card -

फोनमध्ये मायक्रो SD कार्डचा वापर करत असाल, तर ते फोनमधून काढून टाका. यात तुमचा डेटा सुरक्षित आहे की नाही तपासा आणि त्यानंतर फोनमधून SIM हटवा.

बॅकअप -

फोन कोणालाही देण्याआधी त्यातील डेटाचा बॅकअप आवश्यक घ्या. कॉन्टॅक्ट, कॉल रेकॉर्ड, मेसेज, फोटो-व्हिडीओ आणि आवश्यक फाइल्स बॅकअप घेणं गरजेचं आहे. यासाठी ड्राइव्ह किंवा एक्सटर्नल मेमरीची मदत घेता येईल.

Gmail चे हे भन्नाट फीचर्स माहित आहेत का? या सुविधांसह मेल पाठवणं होईल अगदी सोपं

फॅक्ट्री रिसेट करण्यापूर्वी सर्व अकाउंट लॉग-आउट -

फोन फॅक्ट्री रिसेट करण्याआधी सर्व Google आणि इतर ऑनलाइन अकाउंट्स लॉग-आउट करा. त्यानंतर फोन फॅक्ट्री रिसेट करा. लॉगइन अकाउंट्स फोनच्या सेटिंगमध्ये जावून अकाउंट्समध्ये तपासू शकता. फॅक्ट्री रिसेटमध्ये मोबाइलमधील संपूर्ण डेटा डिलीट होतो. फोन सेटिंगमध्ये बॅकअप अँड रिसेट पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण डेटा डिलीट होईल.

फ्री Wifi वापरताना अशी घ्या काळजी; चोरी होऊ शकतो पर्सनल डेटा

WhatsApp Chat Backup -

WhatsApp मध्ये आवश्यक चॅट असल्यास, त्याचादेखील बॅकअप घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या नव्या डिव्हाइसवर WhatsApp Chat Backup रिस्टोर करू शकता.

First published:

Tags: Smartphone