Home /News /news /

...आणि सेनेच्या महापौर PPE कीट घालून कोरोनाबाधितांच्या सेवेत हजर!

...आणि सेनेच्या महापौर PPE कीट घालून कोरोनाबाधितांच्या सेवेत हजर!

शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर प्रत्यक्ष आपल्यासोबत कामात सहभागी झाल्याने कर्मचाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला.

डोंबिवली, 05 मे : महाराष्ट्रासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थिती प्रत्येकजण आपल्या परीने रुग्ण सेवा करत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी  पेडणेकर यांच्यानंतर आता आणखी एक सेनेच्या महापौरांनी परिचारिकेची भूमिकेत जाऊन काम केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता विश्वनाथ राणे यांनी रुग्ण सेवा करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. हेही वाचा - 'ते योद्धे होते, मी रडणार नाही'; शहीद आशुतोष शर्मा यांच्या पत्नीने दिला मुखाग्नी 'माझ्याकडे रुग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे. सध्याच्या परिस्थिती माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील माझे सर्व सहकारी डॉक्टर्स, परिचरिका रुग्णालयातील सर्व स्टाफ जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. मी पेशाने परिचारीका असल्याने माझे मन मला स्वस्थ बसू देत नाही.' असं म्हणत विनिता राणे यांनी रुग्ण सेवा करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. याबद्दल त्यांनी तशी केडीएमसीच्या आयुक्तांकडे मागणीही केली होती. अखेर आयुक्तांनी विनिता राणे यांना रुग्णसेवा करण्यास परवानगी दिली. हेही वाचा - कोरोना व्हायरसचा परिणाम सगळ्याच प्राण्यांवर का नाही होत? त्याप्रमाणे विनिता राणे आज शासकीय वाहन व अंगरक्षकाशिवाय सामान्य परिचरिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्रीनगर येथील कोविड रुग्णालयात दाखल झाल्या. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली PPE किट परीधान करून रुग्णांची पाहणी केली आणि रुग्णांच्या उपचाराबाबत आढावा घेतला. तसंच डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मच्याऱ्यांनाही काळजी घेण्याच्या आपुलकीचा सल्लाही राणे यांनी दिला. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर प्रत्यक्ष आपल्यासोबत कामात सहभागी झाल्याने कर्मचाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला. विनिता राणे राजकारणात प्रवेश करण्याच्या आधी  मुंबई महानगर पालिकेच्या बी.वाय.एल नायर रुग्णालयात 32 वर्षे परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Dombivali, Kalyan, KDMC

पुढील बातम्या