डोंबिवलीत बिल्डरकडून फसवणूक, मनपाच्या कारवाईमुळे अनेक संसार रस्त्यावर

बालाजी संकुलातल्या दोन इमारती वर्षभरापूर्वीच उभारण्यात आल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी लाखो रुपयांचे फ्लॅट्स विकत घेऊन इथे रहिवासी वास्तव्याला आले आहेत. मात्र,

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 06:34 PM IST

डोंबिवलीत बिल्डरकडून फसवणूक, मनपाच्या कारवाईमुळे अनेक संसार रस्त्यावर

प्रदिप भणगे, प्रतिनिधी

डोंबिवली, 08 मे : डोंबिवलीच्या नांदिवली भागात बुधवारी केडीएमसीनं 2 अनधिकृत इमारतींवर कारवाई केली आहे. यावेळी संतप्त रहिवाशांनी महापालिकेच्या पथकाला मोठा विरोध केला. नांदिवलीच्या स्वामी समर्थ मठाजवळ असलेल्या बालाजी कॉम्प्लेक्स संकुलावर ही कारवाई करण्यात आली. त्यावर आज महापालिकेने कारवाई केली आहे.

बालाजी संकुलातल्या दोन इमारती वर्षभरापूर्वीच उभारण्यात आल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी लाखो रुपयांचे फ्लॅट्स विकत घेऊन इथे रहिवासी वास्तव्याला आले आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी अचानक या संकुलातल्या घरांवर महापालिकेनं नोटीसा लावल्या. ज्यामध्ये दोन दिवसांत घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं.


या नोटीसा पाहिल्यानंतर रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर आज महापालिकेच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. रहिवाशांनी कारवाईला कडाडून विरोध केला. ज्यावेळी आपण घर घेतलं, त्यावेळी बिल्डरने आपल्याला बांधकाम पूर्ण अधिकृत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

Loading...

हेही वाचा : BREAKING: मुंबईत 55 वर्षाच्या डॉक्टरने केला 21 वर्षाच्या मॉडेलवर बलात्कार

महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना या कारवाईबाबत विचारलं असता, या इमारती डीपी रस्त्यामध्ये येत असल्याने आपण नियमानुसार 3 नोटीसा बजावून ही कारवाई केल्याचं सांगितलं. तर रहिवाशांनी मात्र आपल्याला पहिल्या दोन नोटीसा मिळाल्याच नसून बिल्डरमुळे आपला संसार उध्वस्त झाल्याचं सांगत संताप व्यक्त केला.

दरम्यान, आता या सगळ्यावर बिल्डरवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बिल्डरच्या चुकीमुळे अनेक कुटुंबांवर घर संकट ओढावलं. त्यामुळे त्यांच्या घराचा मुद्दा कसा सोडवला जाणार हा मोठा ऐरणीवरचा प्रश्न आहे.

शिकारी आणि शिकार एकाच विहिरीत रात्रभर मुक्कामी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: KDMC
First Published: May 8, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...