'आपण फक्त सोबत मरू शकतो', विवाहित तरुणाने गर्लफ्रेंडसोबत संपवलं आयुष्य

'आपण फक्त सोबत मरू शकतो', विवाहित तरुणाने गर्लफ्रेंडसोबत संपवलं आयुष्य

आदिवाशी तरुण-तरुणीने एकमेकांसोबत आत्महत्या केली आहे. गावाजवळ असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेतला आणि आयुष्य संपवलं.

  • Share this:

छत्तीसगड, 11 जुलै : एकमेकांच्या सोबत जगू नाही शकत पण मरू शकतो असं म्हणत प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. गावात आदिवाशी प्रेमीयुगुलाचे मृतदेह पाहिल्यानंतर संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. विवाहित तरुणासोबतच्या प्रेम प्रकरणाला घरच्यांकडून नकार दिल्यामुळे यांनी आत्महत्या केली असल्य़ाची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गावात सकाळच्या वेळी तरुण आणि तरुणीचा मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही तरुणांनी फाशी लावत आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर पोलीस आता प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.

घटनसास्थळी मिळाली सुसाईट नोट...

ही घटना छत्तीगडमधील कुकदुर ठाणे परिसरातील आहे. आदिवाशी तरुण-तरुणीने एकमेकांसोबत आत्महत्या केली आहे. गावाजवळ असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेतला आणि आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यााधी दोघांनी एक सुसाईट नोट लिहली आहे. पोलिसांनी सुसाईट नोट ताब्यात घेतली असून आता त्यानुसार प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा: भरदिवसा खळबळजनक घटना, मुलाच्या डोळ्यादेखत आईवर झाडल्या गोळ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक हा आधीच विवाहित होता. त्याचं दुसऱ्या तरुणीसोबत प्रेम प्रकरण होतं. तर तरुणीबद्दल अद्याप कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

वहिनीच्या प्रेमात पडलेल्या दिराने सख्या भावाचाच काढला काटा!

प्रेमाला काही बंधनं नसतात आणि त्यात काही सीमा नसते. प्रेमात वेडा झालेला व्यक्ती काहीही करू शकतो हे तुम्ही पाहिलंच असेल. याचाच एक पुरावा देणार प्रकार समोर आला आहे. वहिणीच्या प्रेमात पडलेल्या एका तरुणाने चक्क आपल्या भावाची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वहिनीच्या प्रेमाचं भूत असलेल्या एका तरुणाने तिला मिळवण्यासाठी आपल्या सख्या भावाची हत्या केली. बरं इतकंच नाही तर भावाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने शव नदीत फेकून दिलं. पोलिसांच्या कसून चौकशीनंतर ही घटना उघडकीस आली आहे.

वहिनीसाठी भावाचा जीव घेणारा पोलिसांच्या ताब्यात

छोटेलाल राय असं मृत भावाचं नाव आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शैलेंद्र राय आणि मृत छोटेलालच्या पत्नीचा ताब्यात घेतलं आहे. आपल्या प्रेमाला जिंकण्यासाठी भावाचाच जीव घेतल्य़ामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. 'भाऊ माझ्या आणि वहिनीच्या प्रेमाच्या आड येत होता. त्यामुळे मी त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला' अशी कबुली आरोपी शेलैंद्रने पोलिसांत दिली आहे.

कोब्रा आणि बेडकामध्ये जगण्यासाठी लढाई, VIDEO व्हायरल

First published: July 11, 2019, 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading