'कटप्पा'च्या मुलीने लिहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

'कटप्पा'च्या मुलीने लिहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

या पत्रातून त्यांना धमक्या देणाऱ्या औषध कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांना केलीय.

  • Share this:

17जुलै : बाहुबली चित्रपटातून कट्टपाच्या भूमिकेतून लोकांची मनं जिंकणाऱ्या 'सत्यराज' यांच्या मुलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांना धमक्या देणाऱ्या औषध कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांना केलीय.

सत्यराज यांची मुलगी दिव्या या पोषण आहार तज्ज्ञ आहेत. काही औषध कंपनी त्यांची औषधं रूग्णांना लिहून द्यायला सांगत होत्या.  औषधं तपासली. त्या औषधांमध्ये लिव्हरला, दृष्टीला हानीकारक सॉल्टस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे दिव्या यांनी ती औषधं रूग्णांना सुचवण्यास नकार दिला. त्यांनी नकार दिल्यावर त्या कंपनीने दिव्या यांना धमकवण्यास सुरूवात केली.

याच अनुशंघाने दिव्या यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय.आपल्या पत्रात दिव्या यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारलाय,की 'या औषधांपासून लोकांचे रक्षण कोण करेल?' तसंच या प्रकारच्या गैरव्यवहारांना चाप बसवण्याबाबतही त्यांनी मोदींना विचारणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2017 11:00 PM IST

ताज्या बातम्या