VIDEO- ...म्हणून कतरिनाने रणबीर- आलियापेक्षा अर्जुन- मलायकाच्या जोडीला निवडलं

VIDEO- ...म्हणून कतरिनाने रणबीर- आलियापेक्षा अर्जुन- मलायकाच्या जोडीला निवडलं

'बार बार देखो' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं ब्रेकअप झालं होतं. तो काळ कतरिनासाठी फार कठीण होता. ती एकदा तिला योग शिकवणाऱ्या शिक्षिकेसमोरच ढसाढसा रडायला लागली होती.

  • Share this:

मुंबई, 31 मे- बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकमेकांना सात वर्ष डेट करत होते. ते लवकरच लग्न करणार असं त्यांच्या चाहत्यांना वाटत असतानाच दोघांनी ब्रेकअप केलं. दरम्यान, नुकतीच कतरिना नेहा धुपियाच्या बीएफएफ विथ वोग सिझन २ शोमध्ये गेली होती. यावेळी तिने अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी नेहाने तिला प्रश्न विचारला की, जर आलिया- रणबीर आणि मलायका- अर्जुन यांनी एकाच दिवशी लग्न केलं तर तू कोणाच्या लग्नाला जाणार?

‘या’ आजाराने त्रस्त होत्या तनुजा, करावी लागली सर्जरी

हा प्रश्न जर दुसऱ्या एखाद्या सेलिब्रिटीला विचारला असता तर त्यांनी वेळ मारून नेण्यासाठी वेगळंच उत्तर दिलं असतं पण कतरिनाने मात्र थेट उत्तर देण्यालाच प्राधान्य दिलं. या प्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली की, ‘जर रणबीर आणि अर्जुन दोघांनी एकाच दिवशी लग्न केलं तर मी अर्जुनच्या लग्नाला जाईन कारण तो माझा भाऊ आहे. मी त्याला राखी बांधली आहे.’ काही दिवसांपूर्वी कतरिनाने अर्जुनला भाऊ केलं तर चालेल का असा प्रश्न विचारला होता. यावर अर्जुनने नाही असंच उत्तर दिलं होतं. पण त्याच्या नकाराकडे तिने फारसं लक्ष दिलं नाही आणि त्याला राखी बांधली होती.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात गर्दीत अडकल्या आशा भोसले, स्मृती इराणींनी अशी केली मदत

कपिल शर्मापासून कंगना रणौतपर्यंत या कलाकारांनी लावली मोदींच्या शपथ ग्रहणाला हजेरी

कतरिनाने यावेळी नेहाच्या साऱ्याच प्रश्नांची निर्भिडपणे उत्तरं दिली. ‘अशी कोणती व्यक्ती आहे जिला तू स्वतःचं गुपित कधीच सांगणार नाही?’ असा प्रश्न नेहाने विचारल्यावर कतरिनाने कोणताही विचार न करता रणबीर कपूरचं नाव घेतलं. यासोबतच रणबीरसोबतच्या ब्रेकअपमधून बाहेर पडायला कतरिनाला किती कष्ट घ्यावे लागले याबद्दलही तिने सांगितलं. 'बार बार देखो' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं ब्रेकअप झालं होतं. तो काळ कतरिनासाठी फार कठीण होता. ती यातून बाहरे पडण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत होती.

VIDEO- आजोबांच्या आठवणीत ढसाढसा रडली न्यासा देवगण, बाबांनी असे सावरले

दरम्यान, ती एकदा तिला योग शिकवणाऱ्या शिक्षिकेसमोरच ढसाढसा रडायला लागली. तिला आपलं दुःख कोणासोबत तरी शेअर करायचं होतं. अनेक प्रयत्नांनी कतरिना यातून बाहेर पडली. कतरिनाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, ५ जून रोजी तिचा बहूप्रतिक्षीत भारत सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार आहे. सलमान- कतरिनाशिवाय दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

बायको- मुलांसोबत सहा वर्षांनी आमिर खान करणार घरी परतणार

VIDEO : ईश्वराची शपथ न घेता रामदास आठवलेंनी अशी घेतली शपथ

First published: May 31, 2019, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading