कठुआ बलात्कार, हत्या प्रकरणी आज सुनावणी; नराधमांना काय शिक्षा ठोठावणार न्यायालय?

कठुआ बलात्कार, हत्या प्रकरणी आज सुनावणी; नराधमांना काय शिक्षा ठोठावणार न्यायालय?

kathua Rape Case : नराधमांना आज सुनावणार शिक्षा.

  • Share this:

कठुआ, 10 जून : देशाला हादरून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणात आज नराधमांना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. 2018मध्ये जम्मू – काश्मीरमधील कठुआ येथे बकरवाल समाजातील 8 वर्षाच्या मुलीला ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांचा सहभाग देखील समोर आला होता. या साऱ्या घटनेनं देश हादरून गेला होता. देशभर संतापाची लाट उसळली होती. त्याच प्रकरणी पठाणकोट विशेष न्यायालय आज नराधमांना शिक्षा ठोठावणार आहे. न्यायालय नराधमांना काय शिक्षा देणार याकडे आता साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 3 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

8 पैकी 7 आरोपींवर आरोप निश्चित

पठाणकोठ न्यायालयानं 8 पैकी 7 आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप निश्चित केला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाविरोधात केस चालू शकली नाही. मुलाच्या वयाचा विचार करता जम्मू – काश्मीर उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. 7 आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे.

Operation All Out : दहशतवाद्यांचं ‘गुप्त’ ठिकाण भारतीय सैन्यानं केलं उद्धवस्त

देशभर केला होता निषेध

कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणानं सारा देश हादरून गेला होता. देशभर निषेध मोर्चे काढण्यात आले होते. दरम्यान, आजच्या सुनावणीकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

विधानसभेचा गड जिंकण्यासाठी भाजपच्या चाणक्यांचा मुख्यमंत्र्यांना मंत्र

काय आहे प्रकरण

गुन्ह्यातील मास्टरमाईंडने बकरवाल समाजातील मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी हे निर्घृण कृत्य करण्यास भडकवल होतं. अमानवी कृत्य करण्यासाठी त्याने आपल्या भाच्यासह आणखी सहा जणांना भडकवले होतं. अशी धक्कादायक माहिती चौकशीअंती समोर आली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाज प्रामुख्याने गुराखीचे काम करतात. कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले होते की, 'या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असे'.

VIDEO : सोलापूरमध्ये अग्नितांडव, दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान

First published: June 10, 2019, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading