कठुआ बलात्कार-हत्या प्रकरण : 8 वर्षांच्या चिमुरडीला यातना देणारे 6 आरोपी दोषी

कठुआ बलात्कार-हत्या प्रकरण : 8 वर्षांच्या चिमुरडीला यातना देणारे 6 आरोपी दोषी

kathua rape case : दुपारी 2 वाजता सुनावणार शिक्षा

  • Share this:

पठाणकोट, 10 जून : देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींना पठाणकोट न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. त्यांना दुपारी 2 वाजता शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. 2018मध्ये जम्मू – काश्मीरमध्ये झालेल्या कठुआ बलात्कार प्रकरणानं सारा देश हादरून गेला होता. या प्रकरणामध्ये पठोणकोट न्यायालयानं सहा जणांना दोषी ठरवलं आहे. कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात सात जणांना समावेश आहे. यामध्ये एका अल्पवीयन मुलाचा देखील समावेश आहे. 2018मध्ये जम्मू – काश्मीरमधील कठुआ येथे बकरवाल समाजातील 8 वर्षाच्या मुलीला ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांचा सहभाग देखील समोर आला होता.
संतापजनक ! हँडपंपवर पाणी भरण्यास गेलेल्या दलित महिलेला विवस्त्र करून अमानूष मारहाण

7 आरोपींवर आरोप निश्चित

3 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. दोषी आरोपींना न्यायालय दुपारी दोन वाजता शिक्षा ठोठावणार आहे. या नराधमांना काय शिक्षा होणार याकडे देखील आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. कठुआ प्रकरणात पोलिसांचा सहभाग देखील समोर आला होता.


भाविकांवर काळाचा घाला, बस अपघातात 11 जणांचा मृत्यू

काय आहे प्रकरण

गुन्ह्यातील मास्टरमाईंडने बकरवाल समाजातील मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी हे निर्घृण कृत्य करण्यास भडकवल होतं. अमानवी कृत्य करण्यासाठी त्याने आपल्या भाच्यासह आणखी सहा जणांना भडकवले होतं. अशी धक्कादायक माहिती चौकशीअंती समोर आली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाज प्रामुख्याने गुराखीचे काम करतात. कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले होते की, 'या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असे'.


VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 12:11 PM IST

ताज्या बातम्या