बर्फवृष्टीत 'या' मुलीने केलं मजेशीर रिपोर्टिंग, VIDEO वर कौतुकांचा पाऊस

अतिबर्फ पडल्यानंतर तिथे राहणाऱ्या काही मुलांनी बर्फाचा बोगदा बनवला होता. याच बोगद्याची माहिती या मुलीने तिच्या रिपोर्टिंगमध्ये दिली आहे.

अतिबर्फ पडल्यानंतर तिथे राहणाऱ्या काही मुलांनी बर्फाचा बोगदा बनवला होता. याच बोगद्याची माहिती या मुलीने तिच्या रिपोर्टिंगमध्ये दिली आहे.

  • Share this:
    जम्मू-काश्मीर, 10 फेब्रुवारी : काश्मीर म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो दहशतवाद. पण त्याच्या पलीकडे एक वेगळा काश्मीरदेखील आहे. ज्याचं जीवंत उदाहरण म्हणजे ही छोटीशी मुलगी. काश्मीरमधल्या एका मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरून या मुलीवर कौतुकांचा पाऊस पडतोय. या व्हिडिओमध्ये प्रचंड बर्फात एक मुलगी रिपोर्टिंग करत आहेत. अगदी प्रोफेशनल पद्धतीने या मुलीने काश्मीरमध्ये होणाऱ्या बर्फाचा मजेशीर रिपोर्ट दिला आहे. या मुलीचं नाव समजू शकलं नाही पण ही काश्मीरच्या शोपियामध्ये राहणारी आहे. अतिबर्फ पडल्यानंतर तिथे राहणाऱ्या काही मुलांनी बर्फाचा बोगदा बनवला होता. याच बोगद्याची माहिती या मुलीने तिच्या रिपोर्टिंगमध्ये दिली आहे. अगदी हटके पद्धतीने याची रिपोर्टिंग केली आहे. सगळ्यात भारी म्हणजे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मार्बलच्या एका छोट्या तुकड्याला माईक समजून त्यावर रिपोर्टिंग करत आहे. अगदी स्पष्ट आणि मजेशीर भाषेमध्ये या मुलीने बर्फ आणि बोगद्याचं सुंदर रिपोर्टिंग केलं आहे. बरं इतकंच नाही तर ऐवढ्या बर्फात उभं राहुन तिने 2 लहान मुलांचा इंटरव्ह्यूदेखील घेतला आहे. तिच्या भाषेमुळे आणि बोलण्याच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर तिचं खूप कौतुक होत आहे. Special Report : अण्णा आणि राष्ट्रवादीचं नेमकं नातं काय?
    First published: