• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • करुणा धनंजय मुंडेंनी Facebook LIVE करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून केली 'ही' विनंती

करुणा धनंजय मुंडेंनी Facebook LIVE करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून केली 'ही' विनंती

Karuna Dhanajay Munde Facebook LIVE: करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबूक लाईव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक खास विनंती केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 मे: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आणि करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या नावांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण, करुणा मुंडे यांनी आज एक फेसबूक लाईव्ह (Karuna Munde Facebook Live) केलं आणि त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये करुणा मुंडे यांनी चक्क धनंजय मुंडे यांची सपत्ती जाहीर केली आहे. यासोबतच करुणा मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे हात जोडून एक खास विनंती सुद्धा केली आहे. पाहूयात करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये नेमकं काय म्हटलं आहे. करुणा मुंडे यांनी म्हटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक विनंती करु इच्छिते की, मुंबईत मनोरा आमदार निवासाच्या पुर्नबांधणी करण्यात येत आहे. मात्र, या इमारतीला पुर्नबांधणीची आवश्यकता नाहीये. मी वर्तमानपत्रात वाचलं होतं की, या इमारतीच्या बांधकामासाठी आधी 600 कोटी रुपये खर्च येणार होता आता तो वाढून 900 कोटी रुपये बजेट ठेवला आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेकडे हात जोडून विनंती करते की तुम्ही सुद्धा थोडे जागरूक व्हा. मुख्यमंत्र्यांकडे हात जोडून विनंती आहे की, तुम्ही महाराष्ट्राचं सरकार आहात आणि आमदारांकडे इतके लक्ष देऊ नका. वाचा: करुणा मुंडेच्या 'त्या' पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच उफाळला वाद, धार्मिक भावना दुखावल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मी एका आमदाराची पत्नी आहे. माझे पती एक मंत्री आहेत. तुम्हा पाहा की, माझे पती जेव्हा आमदार होते तेव्हा आमच्याकडे वरळीत 3 बंगले, एक फार्म हाऊस, पुण्यात 2 बंगले, मुंबईत नरिमन पॉईंट आणि सांताक्रुझ येथे दोन फ्लॅट आहेत आणि एक सरकारी बंगला सुद्धा मिळाला आहे. आता माझे पती हे मंत्री आहेत पण ते यापूर्वी आमदार असताना तेव्हा आम्ही आमच्यासाठी इतके काही केलं आहे. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे की, आमदारांसाठी ही इमारत बांधू नका आणि 900 कोटी रुपये खर्च करू नका. वाचा: प्रेमकथा मांडणारं पुस्तक करणार प्रदर्शित, 'करुणा धनंजय मुंडे' यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ मुंबईतील धारावीत जवळपास 30000 नागरिक राहतात आणि तेथे पाणी, शौचालयांचा अभाव आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांची दुरावस्था आहे त्यांच्या घरांचे रिनोव्हेशन करा. मनोरा आमदार निवासाची पुर्नबांधणी करण्याची काहीही गरज नाहीये. हा जनतेचा पैसा आहे. काही दिवसांपूर्वी मी वाचलं होतं की, आदित्य ठाकरेंनी 3600 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्याच्या रिनोवेशनसाठी दिले. माझे पती ज्या बंगल्यात राहतात ते पाहिलं आहे मी तेथे रिनोवेशनची काहीही आवश्यकता नाहीये.
  Published by:Sunil Desale
  First published: