विठ्ठला... राज्यातला शेतकरी सुखी होऊदे, चंद्रकांत पाटील यांचे साकडे

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 10:31 AM IST

विठ्ठला... राज्यातला शेतकरी सुखी होऊदे, चंद्रकांत पाटील यांचे साकडे

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता  सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले. यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातीला दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले असंही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.

सध्या अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही  मदत  मागितली असल्याचं यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं.

गेली तीन चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला.  वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे, असेही ते म्हणाले.

मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मुर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 10:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...