...तर, आम्ही दीपिकाचं नाक कापून टाकू, पद्मावती सिनेमावरून करणी सेनेची नवी धमकी

...तर, आम्ही दीपिकाचं नाक कापून टाकू, पद्मावती सिनेमावरून करणी सेनेची नवी धमकी

संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे या सिनेमासंबंधीचे वादही आणखीनच उफाळून येताहेत. अभिनेत्री दीपिका पादूकोणने या सिनेमाचं प्रमोशन केलं तर आम्ही तिचं नाक कापू टाकू, अशी धमकीच श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली आहे.

  • Share this:

16 नोव्हेंबर : संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसे या सिनेमासंबंधीचे वादही आणखीनच उफाळून येताहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या सिनेमाचं प्रमोशन केलं तर आम्ही तिचं नाक कापू टाकू, अशी धमकीच श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली आहे.

आम्ही कसल्याही परिस्थितीत उत्तरप्रदेशात हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचंही करणी सेनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आलंय. या सिनेमात राणी पद्मावतीला डान्स करताना दाखवल्याने समस्त राजपूत समाजाचा अपमान झाल्याचं लोकेंद्र सिंह यांनी म्हटलंय.

येत्या 1 डिसेंबरला पद्मावती सिनेमा सिमेमागृहांमधून प्रदर्शित होतोय. दरम्यान, राजपूत समाजातील वाढती नाराजी लक्षात घेता किमान उत्तरप्रदेशात तरी हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी आदित्यनाथ सरकारने केंद्र सरकारला केलीय. करणी सेनेच्या समर्थकांनी या पद्मावती सिनेमाविरोधात सरकारला रक्ताची चिठ्ठी पाठवून संजय लिला भन्साळीचा निषेध केलाय. म्हणूनच इकडे मुंबईत खबरदारी म्हणून संजय लीला भन्साळीच्या घरासमोरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2017 04:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading