बंगळूरू,ता.11,मे: कर्नाटक विधासभेच्या 223 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात होणार असून संध्याकाळी 6 पर्यंत मतदान चालणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या एकून 224 जागा असून बनावट मतदान ओळखपत्र सापडल्यानं आर आर नगर विधानसभा मतदारसंघात 28 मे रोजी मतदान होणार आहे तर 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्यात एकून 4 कोटी 98 लाख मतदार आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.
15 मे रोजी निकाल जाहीर होणार असून जनतेनं कुणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Karnataka, Voting, कर्नाटक, काँग्रेस, निवडणूक, भाजप, मतदान, येडुरप्पा, विधानसभा, सिद्धरामय्या