S M L

बोपय्यांची निवड बेकायदेशीर, काँग्रेसची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

बोपय्या यांनी येडियुरप्पांच्या विरोधात जाऊन त्यांनी बंडखोरी केली होती अशी आठवण सुरजेवाला यांनी करून दिली

Sachin Salve | Updated On: May 18, 2018 08:19 PM IST

बोपय्यांची निवड बेकायदेशीर, काँग्रेसची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

कर्नाटक, 18 मे : कर्नाटक सत्ता संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. भाजपने आणखी एक खेळी करत हंगामी अध्यक्षपदी आपले आमदार के.जी. बोपय्या यांना बसवलंय. काँग्रेसने यावर जोरदार आक्षेप घेतला असून सुप्रीम कोर्टात धाव घेतलीये.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींनी नाट्यमय वळण घेतलं.  राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के.जी. बोपय्या यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलीय. संकेतानुसार सभागृहातल्या सर्वात ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती या पदावर केली जाते. 71 वर्षांचे काँग्रेसचे आमदार आर.व्ही.देशपांडे हे सभागृहातले सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना डावलून बोपय्यांची नियुक्ती केल्यानं राज्यपालांच्या निर्णयावर काँग्रेस आणि जेडीएसने टीका केलीय.

या निर्णयाविरोधात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. बोपय्या यांनी अनेक वेळा राज्यघटनेचा अवमान केलाय. एवढंच नाहीतर येडियुरप्पांच्या विरोधात जाऊन त्यांनी बंडखोरी केली होती अशी आठवण सुरजेवाला यांनी करून दिली. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये. यावर रात्रीच सुनावणी व्हावी अशी विनंतीही करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2018 07:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close