News18 Lokmat

चंद्रग्रहणाची छाया, कर्नाटकातले नेते देवपूजेत व्यस्त

शंभर वर्षातं सर्वात मोठं चंद्रग्रहण शुक्रवारी असताना कर्नाटकातल्या सर्वच पक्षांचे नेते दिवसभर पुजेत व्यस्त होते.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2018 09:37 PM IST

चंद्रग्रहणाची छाया, कर्नाटकातले नेते देवपूजेत व्यस्त

बंगळूरू,ता.27 जुलै : ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना आहे. त्याचा माणसाच्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही असं शास्त्रज्ञांनी कितीही सांगितलं तरी सामान्य माणसं मात्र त्याल धर्माशी जोडून घेतात. ज्यांनी राज्याला दिशा द्यावी अशी अपेक्षा असते असे नेतेही याला अपवाद नाहीत. शंभर वर्षातं सर्वात मोठं चंद्रग्रहण शुक्रवारी असताना कर्नाटकातल्या सर्वच पक्षांचे नेते दिवसभर पुजेत व्यस्त होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि लोक निर्माण मंत्री एच.डी. रेवन्ना यांनी गुरूवारीच तिरूपतीला जावून दर्शन घेतलं. तर एच.डी. देवेगौडा हे दिवसभर आपल्या घरीच पुजाअर्चेत व्यस्त होते. त्यांच्या घरी चंद्रग्रहणानिमित्त विशेष पूजा करण्यात आली.

चंद्रग्रहणाच्या काळात भाजप नेत्यांनी कुठलही राजकीय काम करू नये असा अलिखित फतवाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांनी काढले आहेत. येडियुरप्पा हे गुरूवारीच जिंदाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. युडियुरप्पा आणि देवेगौडा हे कर्नाटकातले दोन मोठे नेते अतिशय श्रद्धाळू असून कर्मकांड करण्याकडे त्यांचा जास्त कल असतो.

चंद्रग्रहण 2018 : समज आणि गैरसमज

PHOTOS : चंद्रग्रहण का आहे महत्त्वाचे?, जाणून घ्या ही 5 कारणं

क्विंस रोडवर असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी दिवसभर शुकशुकाट होता. तर विधानसभेत आज एकही आमदार फिरकला नसल्याने कामकाज पूर्णपणे बंद होतं. माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या आणि शिक्षणमंत्री जी.टी. देवगौडा यांनी मात्र नेहमीच्या दिवसांसारखाच आजचा दिवस घालवला. सिद्धामैय्या हे नेहमीच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते.

Loading...

रिलायन्स इंडस्ट्रिजचा एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा 9 हजार 485 कोटींवर

गुरूपौर्णिमा विशेष : राजकीय नेत्यांचे 'राजकारणात'ले गुरू

ज्योतिष्य आणि ग्रहताऱ्यांवर माझा विश्वास नाही. दररोजच्या सारखाच आजचा दिवस आहे. आज काम केलं तर काही वाईट होईल ही अंधश्रद्धा आहे. सर्व माणसांच्या विचारांवर अवलंबून असतं असं जी.टी. देवगौडा मतं आहे. आपण विज्ञानाला मानतो असं सांगत माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्यांनी ग्रहणाविषयीच्या सर्व समजूती या खोट्या असल्याचं मुख्यमंत्र असतानाच म्हटलं होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...