S M L

कुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा, काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार नाराज

कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक आणि दिग्गज नेते डी. के. शिवकुमार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होत आहेत मात्र ही कुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा आहे.

Ajay Kautikwar | Updated On: May 24, 2018 04:45 PM IST

कुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा, काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार नाराज

बंगळुरू,ता.24 मे: कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक आणि दिग्गज नेते डी. के. शिवकुमार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद आणि अशोक गहेलोत यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

शिवकुमार यांनी अडीच दिवसांमध्ये येडियुरप्पांचं सरकार पाडण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. निवडणूकीचे निकाल आल्यानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आणि शिवकुमार यांच्या कामाला सुरवात झाली होती. काँग्रेसच्या सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणं, त्यांचा भाजपशी संपर्क येवू नये याची काळजी घेणं अशी कामं त्यांनी नेटानी पार पाडलीत आणि भाजपच्या दिग्गजांना घाम फोडला.

शेवटच्या टप्प्यात काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना हैदराबादला घेऊन जाणं आणि विश्वासदर्शक ठरावासाठी परत विधानसभेत घेऊन येणं ही जबाबदारीही त्यांनी फत्ते केली. शेवटच्या दिवशी तर ते स्वत: प्रत्येक आमदाराला बसमधून घेऊन विधानसभेत त्यांच्या आसनापर्यंत घेऊन जात होते. या आधीही त्यांनी अनेकदा संकटमोचकाची भूमिका पार पाडली होती.या कामामुळचं उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी आपलं वजन प्रदेशाध्यक्ष परमेश्वर यांच्या पारड्यात टाकल्यानं उपमुख्यमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागली. त्यामुळं शिवकुमार कमालीचे नारज आहेत.

शिवकुमार हे वोक्कालिंगा समाजाचे आहेत त्यामुळं त्यांना वजनदार पद मिळावं असा दबाव आहे.

आता प्रदेशाध्यक्षपद आणि दोन महत्वाची खाती मिळावी यासाठी ते दबाव आणत आहेत. त्यामुळं कुमारस्वामी सरकारची वाटचाल आव्हानात्मक असणार आहे.

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2018 04:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close