S M L

राज्यपालांचं भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण, येडियुरप्पांचा आज शपथविधी

त्यामुळे उद्या सकाळी 9.30 वाजता भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Sachin Salve | Updated On: May 17, 2018 07:34 AM IST

राज्यपालांचं भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण, येडियुरप्पांचा आज शपथविधी

16 मे : कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला आमंत्रण पाठवलंय. त्यामुळे आज सकाळी 9.30 वाजता भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुणालाही बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. पण काँग्रेस आणि जेडीएसने युती करून सत्ता स्थापनेसाठी दावा केला. यासाठी त्यांनी राज्यपाल गजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावाही केला. तर येडियुरप्पा यांनी मात्र सत्ता आम्हीच स्थापन करणार असा दावा केला. आज दोन वेळा येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतली. तर कुमारस्वामींनीही संध्याकाळी भेट घेऊन आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं.

पण, रात्री राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेसाठी पहिलं निमंत्रण मिळालं. कर्नाटक भाजपकडून याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे सकाळी 9.30 वाजता येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. पण, काँग्रेसने राज्यपालांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 08:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close