कुमारस्वामींच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी; पेट्रोल मात्र महागले

कुमारस्वामींच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी; पेट्रोल मात्र महागले

कर्नाटक राज्य सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.

  • Share this:

कर्नाटक,05 जुलै : राज्य सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाखांचं कर्ज माफ करण्यात आलंय.  यामध्ये 34 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलीय. निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि जेडीएसनं जाहीरनाम्यात ज्या आश्वासनांचा उल्लेख केला होती त्यांची पूर्तंता या बजेटमध्ये केल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. पण दुसरीकडे कुमारस्वामींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलीये.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी विधानसभेत काँग्रेस-जेडी (एस)युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात बेळगावात नवीन सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल BIMS येथे उभारण्यात येणार आहे.  कृष्णा नदी भागात सिंचन योजनेसाठी 100 कोटी रुपये खर्च करून चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी, नागरला, नेझ इत्यादी भागात सुमारे 10,225 हेक्टेर जमिनीत सिंचन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

VIDEO : बापरे!,अंगणवाडीच्या पोषण आहारात शिजवला साप ?

तसंच पेट्रोलवरील कराचा दर सध्याच्या 30 टक्के वरून 32 टक्के आणि डिझेल 19 टक्के वरून 21 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत 1.14 रु. आणि डिझेल 1.12 रु. वाढतील. अन्नभाग्य योजनेत तांदूळ 7 किलोवरून 2 किलोने कपात करण्यात आलीये.

बजेटीमध्ये करण्यात आलेल्या तरतुदी

शिक्षण - 26 हजार कोटी

पाणी - 18 हजार कोटी

शहरी विकास - 17 हजार कोटी

सामाजिक विकास - 14 हजार कोटी

रस्ते - 10 हजार कोटी

ऊर्जा - 14 हजार कोटी

‘जो शीशे के घर मे रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही फेकते’,- मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

मात्र या बजेटमुळं राज्यातले इंधनांचे दर वाढणार आहेत. राज्यात पेट्रोल 1.14 रुपयांनी तर डिझेल 1.12 रुपयांनी वाढणार आहे.

JioGigaFiber,जिओ टीव्ही लाँच,रिलायन्सच्या सभेतील 6 महत्त्वाचे मुद्दे

या बजेटवर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

"मला विश्वास आहे की या बजेटमुळं आम्ही दिलेली आश्वासन आम्ही पूर्ण केलीत. कर्जमाफी केल्यानं शेतीपूरक निर्णय घेण्यात आम्ही यशस्वी झालो, तसंच हे बजेट म्हणजे आमच्यासाठी एक संधी होती असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

या बजेटनुसार कर्नाटक राज्यात 1 हजार नव्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा काढल्या जाणार आहेत.

कर्करोगग्रस्त सोनालीला भेटायला पोहोचला 'हा' सुपरस्टार

First published: July 5, 2018, 4:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading