कर्नाटकच्या राज्यपालांवर राजकीय दबाव, काँग्रेसचा आरोप

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2018 10:24 PM IST

कर्नाटकच्या राज्यपालांवर राजकीय दबाव, काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली, 16 मे : कर्नाटकात भाजपला निमंत्रण देणे हे बेकायदेशीर आहे. राज्यपाल ज्या पद्धतीने वागले त्यावरून त्यांच्यावर राजकीय पक्षाचा दबाव आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केला.

भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते पि. चिंदबरम, कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेतली. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. पण तरीही भाजपने अपक्षांची मोट बांधून आमच्या आधी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. हे भाजपने आता विसरायला नको अशी आठवण चिंदबरम यांनी करून दिली. तसंच कोणतेही नियम हवे तसे बदलू शकत नाही. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेची पायमल्ली केलीये अशी टीका चिंदबरम यांनी केली.

तर राज्यपालांवर राजकीय दबाव असल्यामुळं भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळालंय असा आरोप काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केलाय. यावेळी काँग्रेस नेत्यांनी गोव्यातल्या सत्तास्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा दाखला दिलाय. ही भाजपची 'धन की बात' असल्याचा टोलाही काँग्रेस नेत्यांनी लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2018 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...