कोल्हापूरला येणाऱ्या पार्सलचा रेल्वे स्थानकात स्फोट, 2 जण गंभीर जखमी

कोल्हापूरला येणाऱ्या पार्सलचा रेल्वे स्थानकात स्फोट, 2 जण गंभीर जखमी

ज्या पार्सलचा स्फोट झाला ते तामिळनाडूमधून कोल्हापूरला येत होतं. पण पार्सल अज्ञात स्थळी पडलं आणि नेमकं ते RPF कडे देताना त्याचा स्फोट झाला.

  • Share this:

कर्नाटक, 21 ऑक्टोबर : कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्टेशनवर एक भीषण स्फोट झाला आहे. एका अज्ञात वस्तूचा अचानक स्फोट झाल्यामुळे संपूर्ण स्टेशनवर एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे तर माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पार्सलचा स्फोट झाला ते तामिळनाडूमधून कोल्हापूरला येत होतं. पण पार्सल अज्ञात स्थळी पडलं आणि नेमकं ते RPF कडे देताना त्याचा स्फोट झाला. पार्सल वर राजकीय संदेश असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात मोठा घातपात घडवण्याचा प्लान असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या सगळ्या घटनेनंतर हुबळी रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनाही सुरक्षा राखण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. खरंतर आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका 2019साठीचं मतदान पार पडत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात आज मतदानासाठी नागरिक बाहेर पडत आहे. अशात प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आखण्यात आला आहे.

इतर बातम्या - शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने पोलिसांशी घातली हुज्जत, केली 'ही' मागणी

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी सर्व तयारी पूर्ण झालीय. आज राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. राज्यात शांततेत मतदान पार पडावे म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील मतदान केंद्रांवर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. मतदानकेंद्रांवर मोठी लगबग सुरु असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आलीय. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.

इतर बातम्या - पाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान!

या गोष्टींची काळजी घ्या

1. सोमवारी  मतदानासाठी बाहेर पडताना  स्वतःचा मोबाईल घेऊन  जाऊ नका.

2. मतदान बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत घेऊ नये. त्यामुळे वेळ वाचेल.

3. मतदानाला जाण्याआधी आयोगाच्या APP वर आपले नाव आणि मतदान केंद्र आधीच जाणून घ्या. त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल.

4. मतदान केंद्राबाहेरही मतदतीसाठी अनेक केंद्र उपलब्ध असतात. त्या ठिकाणाहूनही तुम्हाला माहिती मिळू शकते.

5.मतदान करताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (7 सेकंद)  बटण दाबून ठेवा. बीप असा आवाज येईल. त्यानंतरच तिथून बाहेर पडा.

6. EVM मशीनवर बटण दाबताना लक्षात ठेवा की VVPAT मधून स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरचं बोट काढू नका.

7. VVPAT स्लिपसह आपलं टाकलेलं मत त्याच उमेदवाराला पडलेलं आहे की नाही याची खात्री करा.

8. काही तक्रार असल्यास संबंधीत केंद्र अधिकाऱ्याकडे तुम्ही तुमची तक्रार किंवा सूचना नोंदवू शकता. इतर बातम्या -

इतर बातम्या - पुण्यात चंद्रकांत पाटलांनी मतदान केंद्रवरच 'या' नेत्याला दिली खुली ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: karnataka
First Published: Oct 21, 2019 04:33 PM IST

ताज्या बातम्या