EXIT POLL : कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा, जेडीएस ठरणार किंगमेकर?

EXIT POLL : कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा, जेडीएस ठरणार किंगमेकर?

कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई असल्याचं स्पष्ट झालाय. त्यामुळं त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार असा अंदाज आहे.

  • Share this:

मुंबई,ता.12 मे: कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई असल्याचं स्पष्ट झालाय. त्यामुळं त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार असा अंदाज आहे.

तर जेडीएसच किंगमेकर ठरणार असाही निष्कर्ष या एक्झिट पोल मधून स्पष्ट झाला आहे. सर्व एक्झिट पोलची सरासरी काढून न्यूज18 इंडियानं निष्कर्ष काढला असून त्यातही त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर ज्याला आमचं घोषणापत्र मान्य असेल त्याला पाठिंबा देवू असे संकेत जेडीएसनं दिले आहेत.

सर्व एक्झिट पोलची सरासरी

भाजप - 102

काँग्रेस - 87

जेडीएस - 33

असे आहेत एक्झिट पोल

असे आहेत एक्झिट पोल

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2018 09:16 PM IST

ताज्या बातम्या