S M L

काँग्रेस-जेडीएसकडून आमदारांचं समर्थन पत्र सादर,राज्यपाल घेणार कायदेशीर सल्ला

113 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्रही त्यांनी सादर केले. आता राज्यपालांनी कायद्याचा सल्ला घेऊन निर्णय घेणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 16, 2018 07:17 PM IST

काँग्रेस-जेडीएसकडून आमदारांचं समर्थन पत्र सादर,राज्यपाल घेणार कायदेशीर सल्ला

कर्नाटक, 16 मे :

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जेडीएसचे नेते कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी राज्यपालांची भेट घेऊन पुन्हा सरकार स्थापनेचा दावा केला. 113 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्रही त्यांनी सादर केले. आता राज्यपालांनी कायद्याचा सल्ला घेऊन निर्णय घेणार आहे.

काँग्रेस आणि जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी हातमिळवणी केलीये. काँग्रेस आणि जेडीएसने जिंकलेल्या जागाचा आकडा मिळून बहुमताचा 112 जागांचा आकडा पार केलाय. कालच काँग्रेसने स्थापनेचा दावा राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे केलाय. पण भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनीही सत्ता स्थापनेचा दावा केलाय. आज दिवसभरात राज्यपालांच्या भेटीसाठी दोन्ही पक्षांनी वेळ मागितला.संध्याकाळी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना घेऊन कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या राजभवनावर पोहोचले.

काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांकडून समर्थन देणारे पत्रक स्वाक्षरी करून घेतले आहे. दोन्ही पक्षांनी हे पत्रक घेऊन राज्यपालांकडे सादर केलं. मात्र, राज्यपाल वजुभाई वाला यांनी यावर कोणताही निर्णय अद्याप घेतला नाही. कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी कळवलं.

दरम्यान, कुमारस्वामी यांनी भाजपने जेडीएसच्या उमेदवारांना 100 कोटी आणि कॅबिनेट मंत्रिपदाचं आमिष दिलं असा आरोप केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 07:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close