शपथविधीच्या निमित्तानं बंगळुरमध्ये होणार विरोधकांची एकजूट

शपथविधीच्या निमित्तानं बंगळुरमध्ये होणार विरोधकांची एकजूट

  • Share this:

बंगळुरू,ता.22 मे: एच.डी कुमरस्वामी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसच्या वाटयाला 22 मंत्रिपदं येणार आहेत तर जेडीएसच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासहीत 12 मंत्रिपदं येणार आहेत. बुधवारी सायंकाळी शपथविधी होणार असून ते गुरूवारी आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत.

शपथविधीचं निमित्त साधून कुमारस्वामींनी देशभरातल्या भाजप विरोधी नेत्यांना शपथविधीसाठी निमंत्रित केलं असून अनेक दिग्गज त्यासाठी एकत्र येणार आहेत. यातून मोदीविरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न होणार आहे.

शपथविधीला कोण येणार?

राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव

 

First published: May 22, 2018, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading