LIVE NOW

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा अखेर राजीनामा

आता येडियुरप्पा बहुमत कसं सिद्ध करता, भाजप आपली प्रतिष्ठा राखतं का ?, येडियुरप्पा अग्निपरीक्षा पास करतात का याकडे देशाचं लक्ष्य लागलंय.

Lokmat.news18.com | May 19, 2018, 11:46 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 19, 2018
auto-refresh

Highlights

Load More
·कर्नाटक, 19 मे : कर्नाटकमध्ये सत्ता कुणाची ?, अखेर याचा फैसला आज होणार आहे. सत्तेसाठी सुरू असलेल्या रस्सीखेचात भाजप आणि काँग्रेस-जेडीएस पैकी कोण बाजी मारतं याकडे अवघ्या देशाचं लक्ष्य लागलंय. भाजपचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांना दुपारी 4 वाजता बहुमत सिद्ध करायचे आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. सत्ता आता टप्प्यात आलीये असं वाटत असतानाच काँग्रेस आणि जेडीएसने हातमिळवणी करून सत्ता स्थापनेवर दावा केला आणि भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची वेळ आली. साहजिकच भाजप मागे न हटण्याचा निर्णय घेतला आणि कर्नाटक मिळवणारच असा हट्टहास सुरू केला. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला मोठा पक्ष या नात्याने पहिली संधी दिली खरी पण त्यांचा हा निर्णय वादात ठरला. काँग्रेस-जेडीएसने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन हा निर्णय चुकीचा ठरवला. अखेर आज दुपारी 4 वाजता कोर्टाच्या आदेशानुसार येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करायचंय.येडियुरप्पांनी भाजपचंच सरकार येणार असा दावा केलाय. भाजपचे आमदार बोयय्या यांची हंगामी अध्यक्षपदी निवडही करण्यात आली. त्यालाही सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. एकंदरीतच वस्तुस्थिती पाहता भाजपकडे पुरेसं संख्याबळ नाहीच. घोडेबाजार करून भाजपला काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडून सत्ता स्थापन करावी लागणार हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे. पण गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना सुरक्षाकडं पोहोचवलंय. एकही आमदार फुटू नये याची खबरदारी काँग्रेसने घेतलीये. त्यामुळेच आता येडियुरप्पा बहुमत कसं सिद्ध करता, भाजप आपली प्रतिष्ठा राखतं का ?, येडियुरप्पा अग्निपरीक्षा पास करतात का याकडे देशाचं लक्ष्य लागलंय. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपसमोर काय पर्याय उपलब्ध ? भाजपचं सध्याचं संख्याबळ- 104 बहुमताची मॅजिक फिगर - 112 भाजपला आणखी 8 आमदारांची गरज येडियुरप्पा यांच्या समोरचे पर्याय पहिला पर्याय - काँग्रेस, जेडीएस आमदारांची फोडाफोडी करणे शक्यता - पक्षांतर बंदी कायद्यामुळे पर्याय काहिसा जोखमीचा. दुसरा पर्याय- गळाला लागलेल्या विरोधकांच्या आमदारांना गैरहजर राहायला सांगून बहुमतासाठीचं संख्याबळ कमी करणे शक्यता - भाजपसाठी सर्वाधिक सोयीस्कर पर्याय तिसरा पर्याय- जेडीएसचा पाठिंबा मिळवून काँग्रेसला एकटं पाडायचं शक्यता- कुमारस्वामींचा पूर्वइतिहास पाहता काहीच सांगता येत नाही
corona virus btn
corona virus btn
Loading