कर्नाटक निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे

कर्नाटक निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे

कर्नाटकात प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चांगलंच वाग्युद्ध रंगल होतं. भाजप आणि काँग्रेससाठी कर्नाटकची निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय

  • Share this:

15 मे : 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ज्याकडे पाहिलं जातंय. त्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. 224 पैकी 222 जागांचे निकाल आज लागणार आहेत.

12 तारखेला झालेल्या मतदानात 72.36 टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकमध्ये एकूण 10 पक्ष रिंगणात उतरलेत. कर्नाटकच्या 30 जिल्ह्यांमध्ये एकूण 38 मतमोजणी केंद्र आहेत. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं एकूण 16 हजार 662 कर्मचारी तैनात केले आहेत. ईव्हीएम ज्या स्ट्राँग रूम्समध्ये ठेवलेत, तिछे सर्वात जास्त सुरक्षा ठेवण्यात आलीये. सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. आधी पोस्टानं केलेलं मतदान मोजलं जाईल, त्यानंतर ईव्हीएममधली मोजणी सुरू होईल.

कर्नाटकात प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चांगलंच वाग्युद्ध रंगल होतं. भाजप आणि काँग्रेससाठी कर्नाटकची निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय. दरम्यान मतदानानंतर वेगवेगळ्या संशोधन संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार काहींनी भाजपच्या तर काहींनी काँग्रेसच्या बाजूनं अंदाज वर्तवले आहेत. तर देवेगौडांची जेडीएस किंगमेकर ठरणार असल्याचं जवळपास सर्वच एक्झिट पोल सांगतात. त्यामुळे आज कर्नाटकचा कौल कोणा च्या बाजून लागतोय याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

कर्नाटक निवडणुकीतले मुद्दे

- कानडी अस्मितेचं राजकारण

- कर्नाटकचा स्वतंत्र ध्वज

- लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा

- मेट्रोमध्ये हिंदीला विरोध

- मतांचं ध्रुवीकरण

- शेतकरी आत्महत्या

- कायदा आणि सुव्यवस्था

- कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या

- कावेरी पाणीवाटपावरून तामिळनाडूशी वाद

- भ्रष्टाचार

- शहरांमधील अपुऱ्या पायाभूत सुविधा

First published: May 15, 2018, 7:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading