कर्नाटकची जनता कुणाच्या पारड्यात टाकणार मतांचं दान?

कर्नाटकची जनता कुणाच्या पारड्यात टाकणार मतांचं दान?

कर्नाटक विधानसभेसाठी गेली महिनाभर सुरू असलेला घनघोर प्रचार गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता संपला. भाजप आणि काँग्रेसचं आपली सर्व शक्ती या प्रचारात पणाला लावली होती.

  • Share this:

बंगळुरू,ता.10 मे: कर्नाटक विधानसभेसाठी गेली महिनाभर सुरू असलेला घनघोर प्रचार गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता संपला. भाजप आणि काँग्रेसचं आपली सर्व शक्ती या प्रचारात पणाला लावली होती. कुठल्याही परिस्थितीत सत्ता खेचून आणायची अशा जिद्दीनं भाजपनं प्रचार केला तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला कर्नाटक विजय सोपा असणार नाही हे आपल्या प्रचार कौशल्यानं दाखवून दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी सोनिया गांधी, मनमोहन सिंग अशी सर्व दिग्गज नेत्यांनी कर्नाटकातला कानाकोपरा पिंजून काढला. अमित शहा तर गेल्या महिनाभरापासून कर्नाटकात तळच ठोकून होते. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी जोरदार खिंड लढवत भाजपच्या दिग्गज नेत्यांची दमछाक केली.

निवडणूकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देत सिद्धरमय्यांनी भाजपला धोबीपछाड दिला तर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपनं संत महंतांची फोजच कर्नाटकमध्ये कामी लावली होती. कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ता खेचून आणून दक्षिणेचं व्दार उघडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर भाजपच्या दिग्विजयाचा घोडा कर्नाटकात अडवण्याची पूर्ण तयारी काँग्रेसनं केली आहे. शिनिवारी 12 मे रोजी कर्नाटकात मतदान असून 15 मे ला निकाल जाहीर होणार आहेत.

काय आहे जनतेचा कल?

कर्नाटकच्या मतदारांनी 1985 पासून सत्ताधारी पक्षाला पुन्हा बहुमत दिलेलं नाही हा इतिहास आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय निकालाच्या विरूद्ध नेहमीच कर्नाटकनं कौल दिल्याचाही पूर्व इतिहास आहे.

मतदानाच्या आधी झालेल्या सर्व्हेमध्ये कर्नाटकमधली लढाई अटीतटीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय. काही सर्व्हेमध्ये काँग्रेस तर काही मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हटलं आहे. तर जेडीएसच्या हाती सत्तेच्या चाव्या राहतील असंही त्यातून स्पष्ट झालंय.

First published: May 10, 2018, 5:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading