मुलीला लागला विद्युत झटका, आई-वडिल वाचवण्यासाठी धावले आणि...!

मुलीला लागला विद्युत झटका, आई-वडिल वाचवण्यासाठी धावले आणि...!

मासेमारीसाठी नदीपात्रात टाकलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

कर्जत, 09 नोव्हेंबर : कर्जत तालुक्यातील पेज नदीपात्र परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मासेमारीसाठी नदीपात्रात टाकलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यात आई वडिलांसह मुलीचा मृत्यू झाला आहे.

हिरा सीताराम काटे वय 45, सारिका सीताराम काटे वय 17 अशी मृतांची नावे असून ते याच परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये रखवालदारीचे काम करत होते. इतर वेळेत हे कुटुंब मासेमारीचा काम करायचे.

सकाळी जवळच असलेल्या पेज नदीपत्रामध्ये मासे पकडण्यासाठी त्यांनी विद्युत प्रवाह सोडला होता.  या प्रवाहाचा मुलीला झटका लागला तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आई वडिलांनासुद्धा झटका लागून त्यांचा जागीच करूण अंत झाला आहे.

सकाळी 8 वाजता ही घटना घडली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसंच घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी तात्काळ जाऊन मृतदेह ताब्यात घेतले.

तर मृतदेह नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात आता कर्जत पोलीस अधिक तपास करत आहेत. पण ऐन दिवाळीत एकाच कुटुंबातील सगळ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

काटे कुटुंबातील या तिघांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण यात पोलीस या प्रकरणात काटे कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर मासेमारीसाठी विद्युत प्रवाहाचा वापर न करण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.

'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल

Tags:
First Published: Nov 9, 2018 10:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading