एकदाची 'कर्जमाफी'ची तारीख जाहीर झाली...!

अखेर येत्या 1 ऑक्टोबरपासून कर्जमाफी लागू होणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीच आज हे जाहीर केलं. मंत्रिगटाच्या बैठकीत कर्जमाफीसाठी अर्ज मागवण्याची मुदत 15 सप्टेंबर नक्की करण्यात आली. आजपर्यंत साधारण 30 लाख शेतकर्यांचे अर्ज भरून झाल्याचा दावा सरकारने केलाय. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरमध्ये कर्जमाफीचे फॉर्म तपासले जातील.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2017 11:35 PM IST

एकदाची 'कर्जमाफी'ची तारीख जाहीर झाली...!

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 22 ऑगस्ट " हो नाही, हो नाही करत राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली. पण कर्जमाफीचा घोळ काही मिटता मिटेना. कर्जमाफीच्या या गोंधळामुळे सरकारच्या गुडी-गुडी प्रतिमेवर पाणी फेरण्यात विरोधक यशस्वी झालेत. यापेक्षाही सरकारमधील विविध विभागातील मंत्र्यांमध्ये असलेला गोंधळ आणि त्यामुळे रोज बदलणारे जीआर याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाला. अखेर येत्या 1 ऑक्टोबरपासून कर्जमाफी लागू होणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीच आज हे जाहीर केलं.

कर्जमाफी झालीच पाहिजे... ही घोषणा गल्लीपासून ते विधिमंडळ दुमदुमून गेली. विरोधक शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही होते तर सरकार, कर्जमाफी ही बँकांच्या फायद्याची आहे, अशी शंका सरकार उपस्थित करत होतं. शिवसेना मात्र, कर्जमाफी नको कर्जमुक्तीच हवी या मागणीवर अडून बसली होती. पण, सरकार दाद देत नसल्याने शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू झाली, मग सुकाणू समिती स्थापन झाली, त्या समितीतही फूट पडली. अखेर नाही हो म्हणत सरकारने अंशतः, तत्वतः या निकषावर कर्जमाफी जाहीर केली. पण तरीही रोज बदलणारे जीआर यामुळे आणखीनच गोंधळ वाढला. अखेर राज्य सरकारने मंत्रिगटाची स्थापना करून हा विषय कसाबसा मार्गी लावला आणि कर्जमाफीची तारीख नक्की केली.

आज झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत कर्जमाफीसाठी अर्ज मागवण्याची मुदत 15 सप्टेंबर नक्की करण्यात आली. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी राज्यातील 24 हजार ऑनलाईन केंद्रवर अर्ज भरायचा आहे. आजपर्यंत साधारण 30 लाख शेतकर्यांचे अर्ज भरून झाल्याचा दावा सरकारने केलाय. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरमध्ये कर्जमाफीचे फॉर्म तपासले जातील.

Loading...

कर्जमाफीचे निकष, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, त्याची शेतजमीन, कर्जमाफी कुठल्या योजनेत बसते, कर्जमाफी होईल की कर्जाची फेररचना, कुणाचा अर्ज प्रोत्साहन योजनेत समावेश करावा याबाबत निर्णय 30 सप्टेंबर पर्यंत घेण्यात येईल. या सर्वांची बँकेमार्फत तपासणी होईल. अखेर नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी शेतकार्याचं बँक खात्यात जमा केली जाईल.

कर्जमाफीसाठी 30% शेतकऱ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून झालेत. उर्वरित 70 टक्के फॉर्म भरणे बाकी आहे. 100% अर्ज भरून झाल्यानंतर त्याची संपूर्ण तपासणी करायला 40 दिवस लागतील. सर्व सुरळीत झालं तर या चाळीस दिवसात शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी मिळेल अशी आशा करुयात. म्हणूनच. कालच्या ग्रहणावरून खान्देशातली एक म्हण आठवली. 'ता दे दान तो छुटे चांदग्रहान...' जोपर्यंत, दाता म्हणजेच सरकार देत नाही तोपर्यंत कर्जमाफीचं ग्रहण कायम राहील, असंच सध्यातरी दिसतंय. पाहुयात पुढे काय होतंय ते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 11:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...