करिना कपूरला म्हंटलं ‘आंटी’, सोनाक्षीला म्हटलं बिकीनी घाल नाही तर...

सोशल मीडिया हे एक आता असं माध्यम झालं आहे जिथे स्टार थेट त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधू शकतात.

  • Share this:

सोशल मीडिया हे एक आता असं माध्यम झालं आहे जिथे स्टार थेट त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधू शकतात. तर इथे असेही काही लोक आहेत ज्यांना सेलिब्रिटींना ट्रोल करण्यात, त्यांना वाईट बोलल्यावर आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आता अशाच लोकांची खेचण्यासाठी अरबाज खान लवकरच एक नवा शो घेऊन येत आहे. या शोमध्ये ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट वाचण्यात येतील आणि त्या कमेंटवर सेलिब्रिटी रिअक्शन घेतली जाईल.

अरबाज खानच्या या शोचं नाव आहे ‘क्विक हील पिंच’. हा शो यूट्यूबवर रिलीज होणार. यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी येणार आहेत. अरबाज खानच्या ‘क्यू प्ले’ या यूट्यूब चॅनलवर या शोचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर पाहून अनेकांना शोबद्दल उत्सुकता वाटत आहे.

यात सर्वात भारी करिना कपूरचं उत्तर होतं. जेव्हा करिनाला एका ट्रोलरने सांगितलं की, ‘आता तू काकू झाली आहेस तर तरुण असल्यासारखी वागू नकोस.’ यावर सुरूवातीला करिना खूप हसली आणि नंतर म्हणाली की, यांना वाटतं की स्टार्सना मन नसतं.. त्यांना या सगळ्याचं वाईट वाटत नाही, पण शेवटी आम्हीही माणसं आहोत.

तर सोनाक्षी सिन्हाला ट्रोलरने म्हटले की, ‘बिकीनी घाल... अंगप्रदर्शन कर तरच सिनेमात काम मिळेल, नाही तर घरी बसावं लागेल.’ यावर सोनाक्षीने फार मजेशीर उत्तर दिलं. सोनाक्षीशिवाय या शोमध्ये नवाजुद्दीन सिद्दीरी, करण जोहर, सोनम कपूर, सनी लिओनी असे अनेक स्टार्स आले.

अरबाज म्हणाला की, सेक्स, सरोगसीवर कसे प्रश्न विचारले जातात याबद्दल मी करण जोहरशी बोलत होतो. तसेच त्याला त्याच्या कपड्यांबद्दल कसे उलटे- सुलटे प्रश्न विचारले जातात. सुरुवातीला करणला या सर्व गोष्टींचं वाईट वाटायचं पण आता तो सगळ्यांकडे दुर्लक्ष करायला शिकला आहे.

या शोच्या माध्यमातून अरबाजने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांविरोधात न्यायालयीन नियम करण्याची मागणी केली. आता प्रेक्षकांना हा शो आवडतो की नाही हे लवकरच कळेल. येत्या १२ मार्चला हा शो सुरू होणार आहे.

First published: March 7, 2019, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading