Its Confirm! अर्जुन- मलायकाच्या अफेअरवर प्रियांका चोप्राने उघड केलं गुपीत, करिनाही झाली Specchless

Its Confirm! अर्जुन- मलायकाच्या अफेअरवर प्रियांका चोप्राने उघड केलं गुपीत, करिनाही झाली Specchless

अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायकाचं नाव अर्जुन कपूरशी जोडलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते.

  • Share this:

मुंबई, २५ फेब्रुवारी २०१९- सध्या बी- टाऊनमध्ये कॉफी विथ करणचा शेवटच्या एपिसोडबद्दलच बोलले जात आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये करण जोहरची जवळची मैत्रीण करिना कपूर आली होती. करिनासोबत यावेळी प्रियांका चोप्रानेही एपिसोडमध्ये खूप सारा मसाला दिला. दोन्ही अभिनेत्रींनी बॉलिवूडमधील अनेक खुलासे केले. इतर जोडप्यांबद्दल बोलताना कळत- नकळत प्रियांकाने मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनशिपचा उल्लेख केला.

करणने प्रियांकाला विचारलं की, ‘वरुण धवन कोणाला डेट करतोय ते तुला माहीत आहे का?’ प्रियांकाने तिला माहीत नसल्याचं सांगितलं. प्रियांका म्हणाली की, मला माहीत नाही वरुण कोणला डेट करतोय पण मला हे माहीत आहे की अर्जुन मलायकाला डेट करत आहे.’ प्रियांकाचं हे बोलणं ऐकल्यावर करिनाने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण, करणने हाच विषय पुढे नेत करिनाला प्रश्न विचारला की, ‘अर्जुन- मलायका डेट करत आहे हे तुला माहीत आहे का?’

करणच्या या प्रश्नावर करिनाच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. तिने उत्तर देताना म्हटलं की, ‘म्हणजे... हो नक्कीच.’ यानंतर करण म्हणाला की, ‘अशी अफवा आहे की तू तिची ब्राइडमेड होणार आहेस.’ यावर करिना प्रियांकाकडे पाहते आणि हॉलिवूडबद्दल काही तरी सांग असा प्रश्न तिला विचारून पुन्हा एकदा विषय बदलण्याचा प्रयत्न करते. यावेळी करणने अर्जुन- मलायकाचं लग्न कुठे आणि केव्हा होणार याबद्दलही प्रश्न विचारला.

View this post on Instagram

#mallaikaarora #arjunkapoor

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, रविवारी रात्री मलायका आणि अर्जुन दोघंही एअरपोर्टवर पाहण्यात आले. अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर मलायकाचं नाव अर्जुन कपूरशी जोडलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. लवकरच दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. तर अरबाजही जॉर्जियाला डेट करत आहे. मलायका- अर्जुनप्रमाणे अरबाजच्या अफेअरच्याही जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू आहेत.

First published: February 25, 2019, 2:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading