करण जोहरच्या प्रोडक्शन हाउसच्या गोदामाला आग, लाखो रुपयांचं नुकसान

मंगळवारी रात्री २.३० च्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर तातडीने १२ अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 02:58 PM IST

करण जोहरच्या प्रोडक्शन हाउसच्या गोदामाला आग, लाखो रुपयांचं नुकसान

मुंबई, 01 मे- मंगळवारी रात्री करण जोहरच्या गोरेगाव येथील धर्मा प्रोडक्शच्या गोदामाला आग लागून यात लाखो रुपयांचं नुकसान झालं. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गोरेगाव येथील धर्मा प्रोडक्शच्या स्टोरेज यूनिटमध्ये आग लागली. ही आग एवढी भीषण होती की यात प्रोडक्शनच्या अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या.

'KBC'चं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू, असं होऊ शकता तुम्हीही सहभागी

मंगळवारी रात्री २.३० च्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर तातडीने १२ अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अग्नीतांडवात मनुष्यहानी झाली नसली तर सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाकडून यासंबंधी चौकशी सुरू असून गोदामात सुरक्षेच्या सर्व सोयी होत्या की नाही याची चौकशीही केली जाणार आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त उर्मिला मातोंडकरनं शेअर केले 'हे' फोटो

आग भडकण्याचं मुख्य कारण म्हणजे गोदामात ठेवलेले केमिकल असल्याचं म्हटलं जात आहे. प्रत्यक्षदर्शिने म्हटल्याप्रमाणे, ही आग एवढी मोठी होती की अग्निशमन दलाच्या एका जवानाला आग नियंत्रणात आणताना दुखापत झाली.

Loading...

धर्मा प्रोडक्शनकडून यंदाच्या वर्षी केसरी आणि कलंकसारख्या सिनेमांची निर्मिती करण्यात आली.

MaharashtraDay : 'भाडिपा'चं 'जय महाराष्ट्र' गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग

कलंक सिनेमातील अनेक कपडे आणि सामान या गोदामात ठेवण्यात आले असावेत असं म्हटलं जातं. केसरी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांची कमाई केली तर कलंक सिनेमा जेमतेम १२१ कोटी रुपये कमावू शकला. आता लवकरच धर्मा प्रोडक्शनचा ‘स्टूडंट ऑफ दी इअर २’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

VIDEO: दीपिका पदुकोणचा 'बास्केटबॉल' मीडियावर व्हायरल; 'अशी' होती रणवीरची प्रतिक्रिया

VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...