News18 Lokmat

VIDEO: आकाश अंबानीच्या लग्नात असे नाचले हार्दिक पांड्या आणि करण जोहर

बॉलिवूडचा आघाडीचा गायक मीका सिंगच्या लाइव्ह परफॉर्मन्सवर दोघं बेभान होऊन नाचत होते.

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 09:31 PM IST

VIDEO: आकाश अंबानीच्या लग्नात असे नाचले हार्दिक पांड्या आणि करण जोहर

मुंबई, ११ मार्च २०१९- कॉफी विथ करणनंतर करण जोहर आणि हार्दिक पांड्याची भेट थेट आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नात झाली. आनंदाच्या याक्षणी हार्दिक आणि करणने एकमेकांना मिठी मारत धमाकेदार डान्स केला. बॉलिवूडचा आघाडीचा गायक मीका सिंगच्या लाइव्ह परफॉर्मन्सवर दोघं बेभान होऊन नाचत होते. मीका सिंग ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ हे गाणं होता, त्यावर करण आणि हार्दिकने एकत्र ताल धरला.


करण याआधीच त्याच्या पिवळ्या शेरवानीमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. आता त्यात या व्हिडिओचाही समावेश झाला. करणच्या शोमध्ये झालेल्या वादानंतर पहिल्यांदा करण आणि हार्दिक एकत्र आले. करणच्या या शोमध्ये हार्दिक पांड्यासोबत के.एल. राहुलही आला होता. यात हार्दिकने महिलांविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केली होती. हा वाद एवढा वाढला होता की, हॉटस्टारवरून हा एपिसोड काढून टाकण्यात आला होता.


एवढंच नाही तर करण जोहरला सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांची माफीही मागितली होती. तर हार्दिक आणि केएल राहुलवर बीसीसीआयने बंदी घातली होती. आता मात्र हे प्रकरण शांत झालं असून हार्दिक आणि करणने भूतकाळ विसरून नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...