प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण साहेबांना मान्यवरांचे अभिवादन

प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण साहेबांना मान्यवरांचे अभिवादन

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 33 वा स्मृतिदिन, यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच कराडमधील प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज प्रीतिसंगमावर येऊन यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन केलं

  • Share this:

25 नोव्हेंबर, कराड : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज 33 वा स्मृतिदिन, यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच कराडमधील प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि महादेव जानकर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज प्रीतिसंगमावर येऊन यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन केलं, यावेळी त्यांच्यासोबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. तसंच माजी मंत्री पतंगराव कदम यांनीही अभिवादन केलं.

दरम्यान, आज सातारा जिल्ह्यात स्मृती अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याचाही शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

First published: November 25, 2017, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading