'द कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा होणार मोठा धमाका, आता काय करणार अर्चना!

'द कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा होणार मोठा धमाका, आता काय करणार अर्चना!

आता पुन्हा एकदा नवजोत सिंह सिद्धू शोमध्ये पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. जर असं झालं तर अर्चना पूरन पुढे काय करणार याची आता चाहत्यांना उत्सुकता आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : सोनी चॅनलवरील 'द कपिल शर्मा शो' लोकांचा प्रचंड आवडत शो आहे. या शोमध्ये गेस्टची भूमिका साकरणारे नवजोत सिंह सिद्धू काही कारणामुळे शोच्या बाहेर गेले होते. त्यांच्यानंतर अर्चना पूरन सिंह या शोमध्ये गेस्टची भूमिका साकरत आहे. पंरतू आता पुन्हा एकदा नवजोत सिंह सिद्धू शोमध्ये पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. जर असं झालं तर अर्चना पूरन पुढे काय करणार याची आता चाहत्यांना उत्सुकता आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी एंन्ट्री करणार आहे. तिच्या शोमधील एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबतचा एक व्हिडिओ शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवरही शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा हा सरदारजीच्या वेशात आपल्याला दिसत आहे. त्याने पिवळ्या रंगाची पगडी आणि निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. या पेहराव्यामध्ये तो नवजोत सिंह सिद्धू सारखा दिसत आहे. यामुळे सोशल मिडियावर शोमध्ये पुन्हा एकदा सिद्धूजी येणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सरदारजीच्या पेहराव्यामधील कपील शर्माचा व्हिडिओ पोस्ट करत शिल्पा शेट्टीने लिहिले की, 'कपिल शर्माने जेव्हा मला शोमध्ये बोलवले आहे आणि खूप मोठा हंगामा झाला. हे खूप मजेदार आहे, याला चुकवू नका'

First published: January 14, 2020, 7:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading