जेव्हा कपिल शर्माने विचारलं, ‘अमेरिकेतही मोदी आले?’

आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी लाइक आणि शेअरही केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 05:21 PM IST

जेव्हा कपिल शर्माने विचारलं, ‘अमेरिकेतही मोदी आले?’

मुंबई, 29 मे- कॉमेडी किंग कपिल शर्माच्या विनोदबुद्धीबद्दल तर साऱ्यांनाच माहीत आहे. तो प्रत्येक प्रसंगावर आपल्या विनोदबुद्धीने लोकांचं मनोरंजन करत असतो. सध्या त्याच्यावर मोदी फिवर चढला आहे. नुकतंच त्याने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. यात तो मोंदीचं कौतुक करताना दिसतो. कपिल या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी झाला आहे. त्याच्यासोबत चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्तीही त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

कपिल शमशेरच्या लुकमध्ये दिसत आहे. यात तो प्रश्न विचारतो की, ‘चोरी किती वाजता झाली?’ यावर सुमोना म्हणते, ‘आतापर्यंत चोरी झाली नाहीये सर..’ यावर कपिल म्हणतो की, ‘चोरी होण्याआधीच पोलीस हजर राहिली.. वा टाळ्या... ही गोष्ट संपूर्ण मीडियामध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे.

तनुजा यांना केलं रुग्णालयात भरती, आईला पाहायला गेली काजोल

अजयच्या वडिलांच्या चितेसमोर असे बसून होते अमिताभ बच्चन, लिहिली भावुक पोस्ट

एक काम कर अमेरिकेत फोन लाव आणि राष्ट्राध्यक्ष ओबामाशी माझं बोलणं करून दे...’ यावर चंदू म्हणतो की, ‘सर आता ओबामा राष्ट्राध्यक्ष राहिले नाहीत.’ यावर कपिल पटकन बोलतो की, ‘काय, तिकडेही मोदी निवडून आले?’ कपिलच्या या डायलॉगवर प्रेक्षक जोरजोरात हसतात आणि टाळ्या वाजवतात. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी लाइक आणि शेअरही केला आहे.

Loading...

हा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी कपिलने त्याचा शमशेर सिंगच्या लुकमधील एक फोटो शेअर केला होता. कपिलने प्रेक्षकांना शमशेर सिंग किती आवडतो असा प्रश्न विचारला होता. त्याच्या या पोलला अर्ध्याहून जास्त लोकांनी हो असं उत्तर दिलं होतं.

श्रीदेवीचा द्वेष आणि मलायकावर प्रेम कसं? सोशल मीडियावर अर्जुनने दिलं युझरच्या या प्रश्नाचं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...