S M L

चार वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार,पाॅर्न व्हिडिओ पाहून केलं कृत्य

या चारही मुलांनी आपला गुन्हा कबूल केलाय. तुर्तास या चारही मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2018 09:37 PM IST

चार वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार,पाॅर्न व्हिडिओ पाहून केलं कृत्य

उत्तर प्रदेश, 03 जुलै :  कानपूर  इथं एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 6 ते 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या अल्पवय़ीन मुलांवर पाॅक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलीये.

काय आहे प्रकरण ?

कानपूर पोलीस अधिकारी राकेश मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 30 जून रोजी शनिवारी घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी 2 जुलैला पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्या दिवशी या चिमुरडीसोबत ही घटना घडली तेव्हा ती लवकर घरी आली नव्हती म्हणून वडिलांनी या मुलीचा शोध घेतला असता ती घराजवळील एका बंद खोलीत बेशुद्ध आढळून आली. शुद्धीवर आल्यानंतर पीडित मुलीने सर्व हकिकत आई-वडिलांना सांगतील असता एकच धक्का बसला.  संतापलेल्या कुटुंबियांनी या चारही नराधम आरोपींना चोप दिला.

पाॅर्न व्हिडिओ पाहत होते आरोपी

हे चारही अल्पवयीन आरोपी मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ पाहत होते. त्यावरूनच या आरोपींच्या डोक्यात हे सैतानी कृत्य करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि त्यांनी या चिमुरडीवर अत्याचार केला. या प्रकरणाची अधिक चैौकशी सुरू आहे. पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

गुन्हा कबूल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही मुलांनी आपला गुन्हा कबूल केलाय. तुर्तास या चारही मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलीये.

 

हेही वाचा

प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार

Video व्हायरल : भाजप नेत्याची मुजोरी, विद्यार्थिनीला बळजबरीनं मागायला लावली माफी

बुराडी प्रकरण : 11 पाईप, 11 दरवाजे 11 खिडक्या आणि 11 मृतदेह, काय आहे कनेक्शन ?

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close