विकास दुबेचं एन्काउंटर फेक की खरं? प्रदीप शर्मांनी केला अनुभवानुसार खुलासा

विकास दुबेचं एन्काउंटर फेक की खरं? प्रदीप शर्मांनी केला अनुभवानुसार खुलासा

'जेव्हा कधी एखाद्या आरोपीचे एन्काउंटर होते, तेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जातात.'

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा खात्मा केला आहे. ज्या प्रकार पोलिसांनी विकास दुबेचं एन्काउंटर केलं आहे, त्यावरून अनेक सवाल उपस्थितीत झाले आहे. परंतु, मुंबई पोलिसात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचे एन्काउंटर होणे हे साहजिकच आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे, असं मत प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केले.

'जेव्हा कधी एखाद्या आरोपीचे एन्काउंटर होते, तेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जातात. पण, या कुख्यात गुंडाने 8 पोलिसांची हत्या केली तेव्हा कुणीही मानवधिकार आयोगाकडे जात नाही. अशा आरोपींसोबत जे घडले ते बरोबर होते.' असंही प्रदीप शर्मा म्हणाले.

'विकास दुबेचं एन्काउंटर हे मुळीच फेक एन्काउंटर नाही. ज्या गाडीत दुबे होता, त्या गाडीचा ड्रायव्हर हा उज्जैनपासून गाडी चालवत होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे ड्रायव्हर हा तणावात असेल, त्यामुळे गाडीला अपघात झाला. अपघातानंतर दुबेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्यात तो मारला गेला.', असंही प्रदीप शर्मा म्हणाले.

गँगस्टर विकास दुबेच्या 'त्या' काळ्या बॅगमध्ये दडलंय राज, होऊ शकतो मोठा खुलासा

विशेष म्हणजे, प्रदीप शर्मा यांनी मुंबईत अनेक कुख्यात गँगस्टर आणि अंडरवर्ल्डशी संबंधीत गुंडांचं एन्काउंटर केलं आहे.   प्रदीप शर्मा यांची 'चकमकफेक' अधिकारी अशी ओळख होती. 1983 मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलात दाखल झाले होते. शर्मांनी आत्तापर्यंत 100 हून अधिक गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले. गुंड विनोद मटकरचे केलेले एन्काऊंटर विशेष गाजले होते. परवेझ सिद्दीकी, रफिक डबावाला, सादिक कालिया या कुख्यात गुंडांचाही शर्मांनी खात्मा केला होता. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचाही शर्मांनी खात्मा केला होता.

 

मात्र, 2008 मध्ये शर्मा यांना लखनभय्या बनावट चकमकप्रकरणी अटक करण्यात आली. नंतर त्यांना पोलीस दलातून निलंबीत करण्यात आले होते. 2013 मध्ये मुंबई हायकोर्टाने शर्मांची मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक आरोपांमधूनही शर्मांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून विधान सभा निवडणूकही लढवली. पण, यात त्यांना यश मिळू शकले नाही.

असं झालं विकास दुबेचं एन्काउंटर!

मध्य प्रदेशातील उज्जैनी इथे गुरुवारी सकाळी महाकाली मंदिरातून विकास दुबेच्या मुस्क्या आवळण्यात आल्या. संध्याकाळी पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवाली करण्यासाठी उज्जैनी इथून कानपूरच्या दिशेनं प्रवास सुरू झाला.

विकास दुबेचा खेळ खल्लास, ज्या ठिकाणी एन्काउंटर केलं तिथला पहिला VIDEO

शुक्रवारी सकाळी 6.15 च्या सुमारास बर्रा पोलिस स्टेशन परिसरात एसटीएफच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. या अपघातादरम्यान गाडी उलटी झाली. या गाडीमध्ये विकास दुबे जीमध्ये मध्यभागी बसला होता. त्यानं बाजूच्या पोलिसाची बंदूक हिसकवून जखमी असतानाही पळ काढण्याचा प्रयत्न केला.

अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी उलटलेल्या गाडीत विकास दुबेला पाहिलं मात्र त्यानं तिथून पळ काढला होता. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. यादरम्यान विकास दुबे एका ठिकाणी लपून बसल्याचं पोलिसांना दिसलं त्यांनी सरेंडर करण्याचे आदेश दिले. मात्र, विकासनं पोलिसांवर गोळीबार सुरू केला.

'...अन्यथा भारतात सापडणार दररोज 2,87,000 कोरोना रुग्ण', MIT संशोधकांचा दावा

सुरुवातील पोलिसांनी विकासला समजावलं मात्र, तो ऐकत नाही आणि पोलिसांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी गोळीबार सुरू केला. काही क्षण दोन्हीकडून गोळीबार सुरू होता. त्यातील एका पोलिसाची गोळी विकासला लागली. पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं. तातडीनं विकासला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत पोलिसांनी विकासला मृत घोषित केलं. कानपूरमधील 8 पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला.

Published by: sachin Salve
First published: July 10, 2020, 12:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या