'मला गाडीने नको, विमानाने घेवून जा', विकास दुबेच्या खास साथीदाराची कोर्टातच मागणी

महाराष्ट्र एटीएसने शनिवारी ठाण्यातून विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अरविंद त्रिवेदीला अटक केली होती.

महाराष्ट्र एटीएसने शनिवारी ठाण्यातून विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अरविंद त्रिवेदीला अटक केली होती.

  • Share this:
मुंबई, 12 जुलै : 'मला विमानाने घेवून जा जर युपी पोलिसांनी मला जर रस्ते मार्गे नेले तर ते माझा एन्काउंटर करतील अशी भिती विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद त्रिवेदीने आज न्यायालयात केली. महाराष्ट्र एटीएसने शनिवारी ठाण्यातून विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अरविंद त्रिवेदीला अटक केली होती. त्यानुसार त्याला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काउंटर करून यमसदनी धाडलेल्या विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद त्रिवेदी हा भाजीच्या गाडीत बसून ठाण्यात आला होता.  धक्कादायक म्हणजे, विकास आणि अरविंद दोघे एकत्रित उज्जैनला पळाले होते. मात्र, त्यानंतर अरविंदने आपला वेगळा मार्ग निवडत मिळेल त्या गाडीने उलट सुलट प्रवास करत ठाण्याला पोहोचला होता. उज्जैन ते राजस्थान, राजस्थानहून पुण्याला, पुण्याहून नाशिकला आणि शेवटी भाजीच्या ट्रकमधून गुंड अरविंद त्रिवेदी नाशिकहून ठाण्याला आपल्या नातेवाईकांकडे आला होता. विकास दुबेचा खेळ खल्लास, ज्या ठिकाणी एन्काउंटर केलं तिथला पहिला VIDEO ठाण्याच्या कोलशेत येथे जाधववाडीत अरविंद त्रिवेदीचे नातेवाईक राहत होते. त्यांच्याकडे तो आला होता. पण, अरविंद इथं येताच काही तासात त्याची माहिती एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचून अरविंदला त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीसह अटक केली. ठाण्याहून देखील अरविंद तिवारी पळण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याआधीच दया नायक यांनी त्याला अटक केली. नेमकं 6.15 वाजता काय घडलं? वाचा विकास दुबेच्या एन्काउंटरची INSIDE STORY आज अरविंद त्रिवेदी आणि सोनू तिवारीला ठाणे न्यालयात हजर केले असता उत्तर प्रदेश पोलीस या दोघांनीही ताब्यात  घेण्याकरता रवाना झाली आहे. तत्पुर्वी या दोघांची ठाणे न्यायालयाने 21 जुलैपर्यंत तळोजा जेलमध्ये रवानगी केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस येताच या दोघांना त्यांच्या हवाली केले जाईल. याआधी त्यांची कोविड तपासणी केली जाणार आहे.
Published by:sachin Salve
First published: