मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Kangana Ranautनं दिलं ओपन चॅलेंज, '9 तारखेला मुंबईत येते, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा'

Kangana Ranautनं दिलं ओपन चॅलेंज, '9 तारखेला मुंबईत येते, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा'

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे.

मुंबई, 04 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.

'मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.' असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कंगनानं पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा असं खुल आव्हान कंगनानं दिलं आहे.

सुशांत सिंह रजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने केलेल्या विधानांमुळे आणि त्यानंतर मुंबईची पाक व्याप्त काश्मीरसोबत केलेली तुलना यामुळे सोशल मीडियावर आणि विविध स्तरामध्ये कंगनावर अनेकांनी नाराजीचा सूर दाखवला. मुंबईविरुद्ध वक्तव्य केल्यानंत संतप्त ट्वीट करत मराठी कलाकारांनी खडेबोल सुनावले.

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. बॉलिवूडसह मराठी कलाकारही कंगणावर चांगलेच संतापले आहेत. एवढं नाही तर आता कंगणावर सोशल मीडियावरून टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. 'कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai', अशा शब्दांत काही कलाकालांनी कंगनाला सुनावलं आहे.

First published: