करणी सेनेच्या निशाण्यावर मणिकर्णिका, कंगना म्हणाली, ‘मीही राजपूत, प्रत्येकाला नष्ट करेन’
कंगनाने या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे. यात तिने नृत्य केलं आहे तर एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत तिचं रिलेशनशिपही दाखवण्यात आलं आहे

‘मणिकर्णिका’ सिनेमा प्रदर्शित व्हायला आता फक्त एक आठवडा राहीला आहे. मात्र एक आठवड्यापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा ‘पद्मावत’ सिनेमाला विरोध केल्यामुळे चर्चेत आलेली करणी सेना पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. या सिनेमात आक्षेपार्ह विषय असून हा सिनेमा आधी आम्हाला दाखवला जावा नाही तर आम्ही तोडफोड करू. तोडफोड झाल्यास त्याला आम्ही जबाबदार असणार नाही.

करणी सेनेच्या या वक्तव्यानंतर एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली की, ‘सिनेमाला सेन्सॉरकडून हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच चार इतिहासकारांनी या सिनेमाचं कौतूक केलं आहे.’

‘करणी सेना हे सर्व फक्त मला त्रास देण्यासाठी करत आहे. जर त्यांनी हे वेळीच थांबवले नाही तर त्यांना माहीत नाहीये की मीही एक राजपूत आहे. एका एकाला मी नष्ट करेन.’

करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह शेखावत यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, ‘कंगनाने या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे. यात तिने नृत्य केलं आहे तर एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत तिचं रिलेशनशिपही दाखवण्यात आलं आहे. हे आमच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे.’
First Published: Jan 19, 2019 10:28 AM IST