कंगनाचा रणबीर- आलियाला टोमणा, ‘बच्चें है की डंब है की क्या है...’

कंगनाचा रणबीर- आलियाला टोमणा, ‘बच्चें है की डंब है की क्या है...’

त्यांना तरुण कसं कोण म्हणू शकतं. रणबीर 37 वर्षांचा आहे तर आलिया 27 वर्षांची आहे. 27 व्या वर्षी माझ्या आईला तीन मुलं झाली होती.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च- कंगना रणौत मणिकर्णिका सिनेमाच्या यशानंतर आता ती पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. कंगनाकडे 'मेंटल है क्या' आणि 'जयललिता' हे सिनेमे आहेत. सिनेमांसोबत कंगना तिच्या निर्भिड वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या नात्यावर भाष्य केलं.

यावेळी कंगनाने रणबीर आणि आलियाला चक्क मुर्ख म्हटलं. कंगनाने मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं ही, ‘त्यांना तरुण कसं कोण म्हणू शकतं. रणबीर 37 वर्षांचा आहे तर आलिया 27 वर्षांची आहे. 27 व्या वर्षी माझ्या आईला तीन मुलं झाली होती. हे चुकीचं आहे.. ती मुलं आहेत की डंब आहेत की अजून काय आहेत.’

‘जेव्हा सेक्स लाइफवर चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा या सेलिब्रिटींना त्याबद्दल बोलायला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण जेव्हा देशातील महत्त्वपूर्ण गोष्टींवर बोलायची वेळ येते तेव्हा ही आमची खासगी बाब आहे असं बोलून पळ काढतात.’

याआधीही कंगनाने आलियाबद्दल वक्तव्य करत म्हटलं होतं की, ‘आलियाने मला राजी सिनेमाचा ट्रेलर पाठवला होता आणि सिनेमा पाहण्याबद्दलही सांगितलं होतं. ट्रेलर पाहिल्यानंतर मी आलिया आणि मेघना गुलझारला फोनही केला होता. पण माझ्या सिनेमाबद्दल कोणाकडून कसलीच प्रतिक्रिया आली नाही.’

‘आलियाला पुढे येऊन एका महत्त्वपूर्ण सिनेमाला पाठिंबा द्यायला हवा होता. जर तिचा स्वतःचा आवाज नाहीये तर ती फक्त करण जोहरच्या हातचं बाहुली होऊन राहीलं. अशात मी तिला यशस्वी म्हणू शकत नाही. अपेक्षा आहे की तिला यश काय असतं आणि जबाबदारी काय असते हे लवकर कळेल. नेपो गँगचं आयुष्य एकमेकांना मदत करण्यापुरतंच मर्यादीत आहे. अपेक्षा आहे की आलिया यांच्यापेक्षा वेगळी असेल.’

VIDEO : '...तर हीच बॅट डोक्यात घालणार', अर्ज भरताना राजू शेट्टींची आक्रमक प्रतिक्रिया

First published: March 28, 2019, 6:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading