Home /News /news /

कंगनाची 'धाकड'गिरी, सोशल मीडियावर उघड केली आई वडिलांची LOVE STORY

कंगनाची 'धाकड'गिरी, सोशल मीडियावर उघड केली आई वडिलांची LOVE STORY

कंगना म्हणाली की, आम्ही मोठे होत होतो तेव्हा आई वडिलांनी त्यांचं अरेंज मॅरेज आहे, असं आम्हाला खोटं सांगितलं होतं.

    नवी दिल्ली, 19 एप्रिल : सोशल मीडियावर अत्यंत बिनधास्तपणे आणि कशाचीही पर्वा न करता मतं मांडणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे कंगना रनौत. आता तर कंगनानं अगदी बेधडकपणे तिच्या आई वडिलांची लव्ह स्टोरीच सोशल मीडियावर सर्वांना सांगितली आहे. आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानं कंगनानं त्यांची अशी पोलखोल केली. (वाचा-पाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क) कंगनानं ट्विटरवर ट्विट करत आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्याचवेळी कंगनानं आई वडिलांची तक्रार करत त्यांची लव्ह स्टोरी सर्वांबरोबर शेअर केली. कंगना म्हणाली की, आम्ही मोठे होत होतो तेव्हा आई वडिलांनी त्यांचं अरेंज मॅरेज आहे, असं आम्हाला खोटं सांगितलं होतं. पण खूप नंतर आमच्या आजीने आम्हाला त्या दोघांचं अफेयर होतं असं सांगितलं, हे लिहितानाच कंगनानं तिच्या आई वडिलांची लव्ह स्टोरीही थोडक्यात सांगितली. (वाचा-‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप) लग्नाला होता आजीचा विरोध कंगनानं ही स्टोरी सांगताना लिहिलं की, तिच्या वडिलांनी कॉलेजमध्ये असताना एका बस स्टँडवर कंगनाच्या आईला पाहिलं होतं. त्यावेळी कंगनाची आई कॉलेजहून येत होती. त्यानंतर जोपर्यंत कंगनाच्या आईच्या लक्षात आलं नाही, तोपर्यंत रोज ते त्याच बसने प्रवास करत होते असंही कंगनानं सांगितलं. त्यानंतर कंगनाच्या वडिलांनी लग्नासाठी प्रस्ताव ठेवला तेव्हा कंगनाच्या आजोबांनी तो फेटाळून लावला कारण त्यावेळी कंगनाच्या वडिलांची इमेज फार चांगली नव्हती. तसंच आजोबांनी कंगनाच्या आईसाठी एक सरकारी नोकरी असलेला मुलगा पाहिला होता. पण कंगनाची आई वडिलांची लाडकी होती आणि ते लाडानं त्यांना गुड्डी म्हणायचे. त्यामुळं कंगनाच्या आईनं संघर्ष केला आणि या लग्नासाठी वडिलांना म्हणजे कंगनाच्या आजोबांना राजी केलं होतं. ही सर्व लव्ह स्टोरी सांगून कंगनानं तिच्या आई वडिलांना शुभेच्छा दिल्या. कंगनाचा थलायवी हा चित्रपट तयार असून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. कोरोनामुळं निर्माण झालेल्या संकटामुळं चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात आलं आहे. याशिवाय तिच्या आगामी चित्रपटांमध्ये तेजस, धाकड यांचाही समावेश आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Kangana ranaut, Love story, Twitter

    पुढील बातम्या