‘या’ कारणासाठी दररोज कामसूत्रच्या सेटवर यायचे २१ आमदार

आंतरराष्ट्रीय पातळीवर या सिनेमाचं खूप कौतुक झालं. मात्र टायटलमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 03:50 PM IST

‘या’ कारणासाठी दररोज कामसूत्रच्या सेटवर यायचे २१ आमदार

जयपुर, ११ फेब्रुवारी २०१९- प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर या २०१८ मध्ये झालेल्या जयपुर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या खास सत्रात त्यांनी बोल्ड सिनेमांच्या चित्रीकरणावेळी येत असलेल्या अडचणींचा आवर्जुन उल्लेख केला. यावेळी त्यांनी 'कामसूत्र' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभवही शेअर केले.

मीरा नायर म्हणाल्या की, जेव्हा त्या कामसूत्र सिनेमाचं चित्रीकरण करत होत्या, तेव्हा तिथले २१ आमदार दररोज सेटवर येऊन नक्की कोणतं चित्रीकरण सुरू आहे ते पाहायचे. यामागे त्यांचा उद्देश वेगळा होता. त्या पॉर्न सिनेमांचं चित्रीकरण तर करत नाहीत ना हे पाहण्यासाठी ते आमदार दररोज सेटवर यायचे.

मीरा नायर यांचा हा सिनेमा बोल्ड सीन्सने भरलेला होता. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सिनेमाचं खूप कौतुक झालं. मात्र टायटलमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. अनेक ठिकाणी हा सिनेमा प्रदर्शितच झाला नव्हता.मीरा नायर यांनी ‘मिसिसिप्पी मसाला’, ‘द नेमसेक’, ‘मान्सून वेडिंग’, ‘कामसूत्र’ आणि ‘सलाम बॉम्बे’ सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

जयपुर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्या म्हणाल्या की, ‘त्यांच्या आयुष्यात नेहमीच पैशांची चणचण भासत राहिली. सिनेमाच्या निर्मितीसाठी पैसा असणं फार आवश्यक आहे. मात्र मी माझ्या इमॅजिनेशन पावरने ती कमतरताही भरून काढली. सलाम बॉम्बे हा माझा पहिला सिनेमा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणार होता. मीही कानला सिनेमाच्या निमित्ताने गेले. पण माझ्याकडे तेव्हा एवढेही पैसे नव्हते की मी कोणत्या हॉटेलमध्ये थांबू शकेन.’

VIDEO : स्वित्झर्लंड नव्हे, हे आहे आपलं शिमला

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...