News18 Lokmat

कल्याणच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसेचा गोंधळ, बाहेरचे पदार्थ न्यायला बंदी घातल्यानं निषेध

कल्याणच्या एसएम 5 मल्टिप्लेक्समध्ये मनसेचा गोंधळ घातलाय. कालपासून बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी मिळूनही एसएम 5 मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2018 04:36 PM IST

कल्याणच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसेचा गोंधळ, बाहेरचे पदार्थ न्यायला बंदी घातल्यानं निषेध

मुंबई, 02 आॅगस्ट : कल्याणच्या एसएम 5 मल्टिप्लेक्समध्ये मनसेचा गोंधळ घातलाय. कालपासून बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी मिळूनही एसएम 5 मल्टिप्लेक्समध्ये  बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली होती. या मल्टिप्लेक्समध्ये अत्यंत चढ्या दराने  खाद्यपदार्थ विकले जात होते. याचा जाब विचारण्यासाठी मनसे कार्यकर्ते तिथे गेले . आणि त्यांनी त्या मल्टिप्लेक्समध्ये गोंधळ घातला.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरून मुंबई हायकोर्टाने फटकारले होते. आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती  राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली होती.

मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही, 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला ?, असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं.बॉम्बे पोलीस अॅक्टनुसार थिएटर मालकांवर कारवाई करता येईल का ?, याचा तपशील सादर करा असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

मल्टिप्लेक्स सिनेमागृहात मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांविरोधात मनसेनं आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनानंतर आज मल्टिप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत मल्टिप्लेक्सच्या मालकांनी मनसेनं केलेल्या आंदोलनाविरोधात राज ठाकरेंशी चर्चा केली होती. तरीही मनसेनं हे आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...